कपूर घराण्याच्या सूनेचा मराठी अंदाज, आलियाची नऊवारी बनवायला लागले 75 दिवस, असं काय आहे खास?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Alia Bhatt Paithani Saree : अभिनेत्री आलिया भट्ट पहिल्यांदा नऊवारी साडीत झळकली. तिची ही खास नऊवारी साडी तयार करण्यासाठी 75 दिवस लागलेत. तिच्या साडीत असं काय खास आहे?
advertisement
1/7

कपूर कुटुंबाची सून आणि टॅलेंटेड अभिनेत्री आलिया भट्टने पुन्हा एकदा तिच्या पारंपरिक लूकने सर्वांचं मन जिंकलं आहे.
advertisement
2/7
आलियाला तिच्या स्टाईल सेन्ससाठी नेहमीच प्रशंसा मिळते. यावेळीही तिने महाराष्ट्र दिनानिमित्त पारंपरिक अंदाजात एंट्री घेतली.
advertisement
3/7
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने झालेल्या 'वेव्हज समिट'साठी आलियाने पारंपरिक महाराष्ट्रीयन लूक निवडला. या कार्यक्रमासाठी तिने अबू जानी-संदीप खोसला यांच्याकडून खास डिझाइन केलेली नऊवारी पैठणी साडी नेसली होती.
advertisement
4/7
ही साडी हाताने विणलेली असून ती तयार होण्यासाठी एकूण 75 दिवसांचा कालावधी लागला. केशरी आणि गुलाबी रंगाच्या सुंदर मिश्रणाने बनलेली ही साडी तिच्या नाजूक आणि ग्लॅमरस लूकला पूरक ठरत होती.
advertisement
5/7
आलियाने साडी क्लासिक नऊवारी स्टाईलमध्ये ड्रेप केली होती. ज्यामुळे तिच्या लूकला खास मराठमोळा टच मिळाला.
advertisement
6/7
यासोबतच तिने फिरोजा रंगाचे कानातले आणि अंगठी घातली होती. एका हाताच्या मनगटावर घातलेला गजरा तिच्या एकूण लूकमध्ये अधिक उठावदार वाटत होता.
advertisement
7/7
सोशल मीडियावर आलियाच्या या लूकचं प्रचंड कौतुक होत आहे. पारंपरिक साजशृंगारात तिचं हे रूप चाहते आणि फॅशन प्रेमींना विशेष भावलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कपूर घराण्याच्या सूनेचा मराठी अंदाज, आलियाची नऊवारी बनवायला लागले 75 दिवस, असं काय आहे खास?