लग्नानंतर 27 वर्ष नवऱ्यापासून वेगळं राहत होत्या अलका याग्निक; काय होतं या दुराव्यामागचं कारण?
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
90 च्या दशकातील आपल्या सुंदर आवाजानं प्रेक्षकांना घिळवून ठेवणारी गायिका म्हणजे अलका याग्निक. सध्या ही गायिका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. त्यांच्या दोन्ही कानांनी ऐकू येत नसल्याची माहिती समोर आल्यानं त्यांचे चाहते चिंतेत आहे. पण गाण्याव्यतिरिक्त अलका याग्निक त्यांच्या फिल्मी लव्ह स्टोरीमुळेही चर्चेत राहिल्या. त्यांची त्यांच्या नवऱ्याशी पहिली भेट चक्क रेल्वे स्टेशनवर झाली होती. पण त्यानंतर त्या 27 वर्ष नवऱ्यापासून वेगळं राहत होत्या. काय होतं त्यामागचं कारण जाणून घ्या.
advertisement
1/8

'तुमसा कोई प्यारा', 'बड़ी मुश्किल है', 'तेरी चुनरिया', 'ये बंधन तो', 'टिप-टिप बरसा पानी', 'बोले चुड़िया' सारख्या गाण्यांनी अलका याग्निक यांनी 90च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
advertisement
2/8
अलका यांनी वयाच्या 6व्या गाणं गाण्यास सुरूवात केली. शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. 6व्या वर्षी त्यांनी पहिलं गाणं गायलं होतं.
advertisement
3/8
वयाच्या 10व्या अलका आईबरोबर मुंबईत आल्या. इथे त्यांची ओळख राज कूपरबरोबर झाली. त्यांनी अलकाला लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्याशी ओळख करून दिली.
advertisement
4/8
14व्या वर्षी अलका यांनी 'पायल की झंकार' सिनेमात 'थिरकत अंग लचक झुकी' हे गाणं गायलं.
advertisement
5/8
अलका आणि त्यांचा पती नीरज कपूर यांची लव्हस्टोरी फार रंजक होती. दोघांची पहिली भेट रेल्वे स्टेशनवर झाली होती.
advertisement
6/8
नीरज हे शिलांगमधील एक बिझनेसमन आहेत. 1989मध्ये दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर काही काळच ते एकत्र राहिले.
advertisement
7/8
मीडिया रिपोर्टनुसार, दोघांमध्ये कोणतेही मतभेद किंवा भांडण नव्हतं. तरीही दोघे एकमेकांपासून मागील 28 वर्षांपासून दूर राहत होते.
advertisement
8/8
अलका आणि नीरज त्यांच्या कामामुळे मागची 28 वर्ष वेगवेगळे राहत आहेत. अलका या जास्तकरून मुंबईत असतात तर नीरज बिझनेससाठी शिलॉंगमध्ये असतात. दोघेही एकमेकांसाठी वेळ काढून भेटतात. लाँग डिस्टन्स रिलेशनमध्येही दोघांचा संसार सुखाचा झाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
लग्नानंतर 27 वर्ष नवऱ्यापासून वेगळं राहत होत्या अलका याग्निक; काय होतं या दुराव्यामागचं कारण?