TRENDING:

Ankita Walawalkar : 'आज तुम्ही एकत्र आहात पण...' लग्नाला गेली नाही अन् दुसऱ्याच दिवशी अंकिताचा सूरजला मेसेज

Last Updated:
Ankita Walawalkar Post for Suraj Chavan : केळवण केलं, शॉपिंगही करून दिली पण अंकिता वालावलकर सूरज चव्हाणच्या लग्नाला जाऊ शकली नाही. आता तिने पोस्ट लिहित सूरजसाठी खास मेसेज लिहिला आहे.
advertisement
1/7
'आज तुम्ही एकत्र आहात पण...' लग्नाला गैरहजर अन् आता अंकिताचा सूरजला खास मेसेज
रील स्टार आणि बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाणचं 29 नोव्हेंबर रोजी लग्न झालं. सूरजने त्याच्या मामाची मुलगी संजना गोफणे हिच्याबरोबर लग्नगाठ बांधली. मोठ्या धुमधडाक्यात सूरज चव्हाणचं लग्न झालं. लग्नाला प्रचंड गर्दी झाली होती. गावातील, गावाबाहेरच्या अनेक लोकांनी सूरजच्या लग्नाला उपस्थिती लावली होती.
advertisement
2/7
मात्र अनेक नामवंत मंडळींची सूरज चव्हाणच्या लग्नाला अनुपस्थिति पाहायला मिळाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेता रितेश देशमुख, केदार शिंदे सूरजच्या लग्नाला गेले नव्हते. इतकंच काय तर बिग बॉस मराठी 5 मधील देखील अनेक स्पर्धक सूरजच्या लग्नात दिसले नाहीत.
advertisement
3/7
बिग बॉस मराठी 5 ची किलर गर्ल जान्हवी किल्लेकर संपूर्ण लग्नात सूरज चव्हाणची करवली म्हणून मिरवली. त्याचबरोबर पुरुषोत्तमदादा पाटील यांनीही सूरजच्या लग्नाला उपस्थिती लावून शुभाशिर्वाद दिले. पण डीपी दादा, पंढरीनाथ कांबळे इतकंच काय तर सूरजची लाडकी अंकिता ताई देखील लग्नाला आली नव्हती.
advertisement
4/7
कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर ही सूरजच्या लग्नाला जाणार नाहीये हे तिने आधीच सांगितलं होतं. काही नियोजित कार्यक्रमांमुळे अंकिता सूरजच्या लग्नाला जाऊ शकली नाही. सूरजचं लग्न लागत होतं तेव्हा अंकिता नागपूरला तिच्या कुटुंबातील खास व्यक्तीच्या लग्नात होती.
advertisement
5/7
अंकिताने लग्नाआधी सूरजला अनेक गोष्टींमध्ये मदत केली होती. अंकिताने सूरज, त्याची बायको संजना आणि सूरजच्या बहि‍णींची लग्नाची खरेदी करून दिली होती. अंकिताने सूरज आणि संजनाचं केळवण देखील तिच्या घरी मोठ्या थाटात केलं होतं.
advertisement
6/7
सूरजच्या लग्नात जाऊ शकली नसली तरी अंकिताने सोशल मीडियावर पोस्ट लिहित सूरजला शुभेच्छा दिल्या आहेत. अंकिताने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "प्रिय सूरज आणि संजना. आज तुम्ही एकत्र हातात हात घालून नव्या वाटेवर पाऊल ठेवत आहात. या वाटेवर कधी उजेड असेल, कधी अंधार,कधी सावल्या; पण एकमेकांचा आधार, माया आणि एकमेकांची सोबत असेल तर प्रत्येक अडचण सहज पार करते येते."
advertisement
7/7
"जीवनात कितीही बदल झाले तरी एकमेकांसाठीचा आदर, आपुलकी आणि जिव्हाळा कायम ठेवा. छोट्या छोट्या क्षणांत आनंद शोधा, एकमेकांच्या हसण्यात जग जिंका आणि एकमेकांच्या डोळ्यांतील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. नांदा सौख्यभरे ... तुमच्या नवविवाहित जीवनाला मनःपूर्वक, हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा"
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Ankita Walawalkar : 'आज तुम्ही एकत्र आहात पण...' लग्नाला गेली नाही अन् दुसऱ्याच दिवशी अंकिताचा सूरजला मेसेज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल