TRENDING:

ब्रश नाही केला तर... एका दिवसातच दाताची अशी अवस्था, वर्षभरात मृत्यूचा धोका

Last Updated:
Oral Health Brushing Teeth : आळशी लोक हिवाळ्यात याचे सर्वात मोठे बळी असतात. त्यांना थंडीत पाण्याला हात लावू वाटत नाही, म्हणून ते सकाळी ब्रश करणं टाळतात.
advertisement
1/7
ब्रश नाही केला तर... एका दिवसातच दाताची अशी अवस्था, वर्षभरात मृत्यूचा धोका
सध्या थंडी आहे, बरेच लोक पाण्यात हात घालायलाही घाबरतात. अशावेळी अंघोळ काय दात घासणंही नकोसं वाटतं. जाऊ दे एक दिवस ब्रश नाही केला तर काय होतं आहे? असं म्हणत कित्येक जण ब्रशिंग करणं टाळत असतील. पण ब्रश नाही केला तर मृत्यूचा धोका वाढतो हे तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
2/7
तुम्ही फक्त एक दिवस ब्रश केला नाही तर तुमच्या दातांचे काय होतं हे तुम्हाला माहिती आहे का? आणि जर तुम्ही ही सवय वर्षभर लावली तर ती घातक देखील ठरू शकते.
advertisement
3/7
डेंटल असोसिएशन ऑफ इंडियाच्या मते, जेवणानंतर 20 मिनिटांत तोंडातील बॅक्टेरिया साखर आणि स्टार्चचं आम्लात रूपांतर करतात. हे आम्ल दातांचं इनॅमल जो बाह्यथर आहे, तो खाऊ लागतं. ब्रश न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
advertisement
4/7
खाल्ल्यानंतर 4-6 तासांनी दातांवर प्लाक म्हणजे एक चिकट थर तयार व्हायला सुरुवात होते. 12 तासांनंतर प्लाक कडक होतो आणि टार्टर तयार होतो. 24 तासांनंतर हिरड्या सुजायला लागतात, रक्तस्त्राव सुरू होतो आणि तोंडातून दुर्गंधी येऊ लागते.
advertisement
5/7
लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं म्हटलं आहे की जे लोक दररोज दात घासत नाहीत त्यांना मृत्यूचा धोका 25 टक्के जास्त असतो.
advertisement
6/7
एम्समधील एका डेंटिस्टच्या मते, एक दिवसही दात न घासल्याने तोंडात दहा लाख बॅक्टेरिया वाढतात. हे बॅक्टेरिया रक्तप्रवाहात प्रवेश करतात आणि शरीरातील प्रत्येक अवयवाला हानी पोहोचवतात. जर कोणी वर्षभर ब्रश केला नाही तर मृत्यूचे संकेत आहेत.
advertisement
7/7
वर्षभर दात घासले नाहीत तर दात पूर्णपणे कुजू शकतात, त्यात पोकळी, पू आणि वेदना होऊ शकतात. यामुळे हिरड्यांचा आजार होऊ शकतो, ज्यामुळे दात सैल होऊ शकतात आणि बाहेर पडू शकतात. शिवाय, हृदयविकाराचा धोका तिप्पट वाढतो. या बॅक्टेरियामुळे धमन्यांमध्ये जळजळ होते, ज्यामुळे फुफ्फुसांचे संक्रमण आणि न्यूमोनिया होतो. जे लोक दात घासत नाहीत त्यांना तंबाखूशिवायही तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. तंबाखू न खाणाऱ्यांनाही तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
ब्रश नाही केला तर... एका दिवसातच दाताची अशी अवस्था, वर्षभरात मृत्यूचा धोका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल