TRENDING:

Bigg Boss 19: फिनालेच्या आधीच मेकर्सनी शोच्या वेळेत केला मोठा बदल, कुठे आणि कधी पाहता येणार LIVE?

Last Updated:
Bigg Boss 19 Finale: जवळपास साडेतीन महिने चाललेल्या या शोचा महाअंतिम सोहळा पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतानाच, 'मेकर्स'ने ग्रँड फिनालेच्या वेळेत बदल केला आहे!
advertisement
1/8
Bigg Boss 19: फिनालेच्या वेळेत मोठा बदल, कुठे आणि कधी पाहता येणार LIVE?
मुंबई: सलमान खानचा गाजलेला रिॲलिटी शो 'बिग बॉस १९' आता विजेत्याच्या घोषणेसह ७ डिसेंबर २०२५ रोजी संपणार आहे. गौरव खन्ना, अमाल मलिक, फरहाना भट्ट, प्रणित मोरे आणि तान्या मित्तल हे या सिझनचे टॉप ५ फायनलिस्ट आहेत.
advertisement
2/8
'बिग बॉस १९' चा प्रवास २४ ऑगस्टपासून १६ स्पर्धकांसह सुरू झाला होता. नंतर यात दोन वाईल्ड कार्ड स्पर्धक शहबाज बदेश आणि मालती चाह यांनी एन्ट्री घेतली, ज्यामुळे घरात एकूण १८ स्पर्धक होते.
advertisement
3/8
आता यापैकी फक्त पाच स्पर्धक ट्रॉफीसाठी लढत आहेत. या पाच जणांपैकी कोण बाजी मारणार आणि विजेतेपदाचा मान कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
advertisement
4/8
जवळपास साडेतीन महिने चाललेल्या या शोचा महाअंतिम सोहळा पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतानाच, 'मेकर्स'ने ग्रँड फिनालेच्या वेळेत बदल केला आहे!
advertisement
5/8
संपूर्ण सिझनमध्ये 'बिग बॉस' चे एपिसोड्स टेलिव्हिजनवर रात्री १०:३० वाजता आणि ओटीटी ॲप JioHotstar वर रात्री ९ वाजता प्रसारित होत होते. मात्र, अंतिम सोहळ्यासाठी ही वेळ बदलण्यात आली आहे.
advertisement
6/8
टीव्ही आणि ओटीटीची एकच वेळ: ७ डिसेंबर, रविवारी होणारा ग्रँड फिनालेचा एपिसोड टीव्ही आणि ओटीटी या दोन्ही प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी प्रसारित होणार आहे. दोन्ही प्लॅटफॉर्मवर रात्री ९ वाजल्यापासून थेट ग्रँड फिनालेचे टेलिकास्ट सुरू होणार आहे.
advertisement
7/8
याचा अर्थ असा की, ओटीटीच्या वेळेत कोणताही बदल झालेला नाही, पण टीव्हीवरील प्रेक्षकांसाठी फिनाले एपिसोड दीड तास लवकर, म्हणजेच रात्री ९ वाजता दाखवला जाईल.
advertisement
8/8
टॉप ५ फायनलिस्टपैकी विजेता कोण होणार, याचा निर्णय जनतेच्या मतांवर अवलंबून आहे. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला मत देऊन त्याला 'बिग बॉस १९' चा विजेता बनवण्याची संधी होती. मात्र, मतदानाची प्रक्रिया रविवार, ७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता बंद झाली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss 19: फिनालेच्या आधीच मेकर्सनी शोच्या वेळेत केला मोठा बदल, कुठे आणि कधी पाहता येणार LIVE?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल