Bigg Boss 19 मध्ये शॉकिंग मिड वीक एविक्शन, शेवटच्या टप्प्यात घराबाहेर पडणार मास्टरमाईंड
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bigg Boss 19 : 'बिग बॉस 19' मधून नुकतेच अभिषेक बजाज आणि नीलम गिरी या सदस्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अशातच आता या आठवड्यातील मिड वीक एविक्शनमध्ये कोण बाहेर पडणार याकडे 'बिग बॉस' प्रेमींच्या नजरा लागल्या आहेत.
advertisement
1/7

'बिग बॉस 19' हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला असून दररोज नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. एकीकडे काही स्पर्धक या खेळाच्या अंतिम टप्प्यात पोहोचत आहेत. तर काही जणांना मात्र प्रवास संपत आहे.
advertisement
2/7
'बिग बॉस 19'मधून मागील आठवड्यात नीलम गिरी आणि अभिषेक बजाज यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अशातच आता या आठवड्यात मिड वीक एविक्शन होणार आहे.
advertisement
3/7
मिड वीक एविक्शनमुळे या आठवड्यात एका चांगल्या खेळाडूचा प्रवास संपणार आहे. एविक्शनची बातमी समोर येताच नेटकऱ्यांनी फरहाना भट्ट आणि तान्या मित्तल यांच्या घराबाहेर पडण्याच्या चर्चा सुरू केल्या आहेत.
advertisement
4/7
मिळालेल्या माहितीनुसार, फरहाना भट्ट किंवा तान्या मित्तल नव्हे तर मृदुल तिवारी 'बिग बॉस 19'मधून बाहेर पडणार आहे. एका स्पेशल कॅप्टेंसी टास्कनंतर घरातील पूर्ण गेम बदलला जाणार आहे. या आठवड्यात घरातील सदस्य तीन टीममध्ये विभागले जाणार आहेत. टीम गौरव खन्ना, टीम कुनिका सदानंद आणि टीम शहबाज अशा या टीम असतील. तर अमाल मलिक हा टास्क होस्ट करेल.
advertisement
5/7
'बिग बॉस 19'चा या आठवड्याचा कॅप्टन कोण होणार? कोणाचा प्रवास संपणार? कोण खेळात पुढे जाणार? हे जाणून घेण्यास आता 'बिग बॉस'प्रेमी उत्सुक आहेत.
advertisement
6/7
मृदुल तिवारी या आठवड्यात कमी वोट्स मिळाल्याने घराबाहेर पडू शकतो. एकंदरीत 'बिग बॉस 19'च्या शेवटच्या टप्प्यात मृदुल आपला प्रवास संपवणार आहे.
advertisement
7/7
'बिग बॉस 19' या बहुचर्चित वादग्रस्त कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले 7 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. त्यामुळे लवकरच प्रेक्षकांना या पर्वाचा विजेता मिळणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss 19 मध्ये शॉकिंग मिड वीक एविक्शन, शेवटच्या टप्प्यात घराबाहेर पडणार मास्टरमाईंड