TRENDING:

Arijit Singh Retirement: नवीन वर्षात सर्वात मोठा धक्का! अरिजीत सिंगचा प्लेबॅक सिंगिंगला कायमचा रामराम, शॉकिंग कारण आलं समोर

Last Updated:
Arijit Singh Retirement: ज्याच्या गाण्यांनी कधी कोणाचं तुटलेलं मन सावरलं, तर कधी कोणाच्या प्रेमाला शब्द दिले, तो आवाज म्हणजेच अरिजीत सिंग याने गायकीतून निवृत्ती जाहीर केली आहे.
advertisement
1/6
नवीन वर्षात सर्वात मोठा धक्का! अरिजीत सिंगचा प्लेबॅक सिंगिंगला कायमचा रामराम
ज्या आवाजावर अवघ्या देशाने प्रेम केलं, ज्याच्या गाण्यांनी कधी कोणाचं तुटलेलं मन सावरलं, तर कधी कोणाच्या प्रेमाला शब्द दिले, तो आवाज म्हणजेच अरिजीत सिंग याने गायकीतून निवृत्ती जाहीर केली आहे.
advertisement
2/6
२०२६ च्या पहिल्याच महिन्यात बॉलिवूडमधून ही अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. अरिजीतने अधिकृतपणे प्लेबॅक सिंगर म्हणून आपला प्रवास थांबवण्याचा निर्णय घेतला असून, सोशल मीडियावरील त्याच्या पोस्टने चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
3/6
अरिजीत सिंगने 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर एक लांबलचक पोस्ट लिहून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. त्याने म्हटलंय, "नमस्कार, तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. इतकी वर्ष तुम्ही मला एक गायक म्हणून जे प्रेम दिलं, त्यासाठी मी तुमचा ऋणी आहे. पण आता मी एक निर्णय घेतला आहे की इथून पुढे मी प्लेबॅक व्होकलिस्ट म्हणून कोणतीही नवीन असाइनमेंट किंवा काम स्वीकारणार नाही. मी या प्रवासाला पूर्णविराम देत आहे. हा प्रवास खरोखरच विलक्षण आणि सुखद होता."
advertisement
4/6
अरिजीतने जरी चित्रपट संगीतातून निवृत्ती घेतली असली, तरी त्याचा संगीताशी असलेला संबंध तुटलेला नाही. त्याने पुढे स्पष्ट केलं की, "देव माझ्यावर खूप दयाळू आहे. मी चांगल्या संगीताचा चाहता आहे आणि भविष्यात एक छोटा कलाकार म्हणून स्वतःहून बरंच काही शिकण्याचा आणि नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करेन. तुमच्या समर्थनासाठी पुन्हा एकदा आभार." याचाच अर्थ, अरिजीत आता कदाचित स्वतंत्र संगीत किंवा स्वतःच्या प्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रित करणार आहे.
advertisement
5/6
नुकतंच प्रदर्शित झालेलं 'बॅटल ऑफ गलवान' मधील 'मातृभूमी' हे त्याचं शेवटचं गाणं असेल का? यावर उत्तर देताना त्याने सांगितलं की, "काही जुने करार अद्याप बाकी आहेत, ते मी पूर्ण करणार आहे. त्यामुळे या वर्षी माझी काही गाणी नक्कीच रिलीज होतील. मी संगीत बनवणं थांबवणार नाही, हे नक्की."
advertisement
6/6
'तुम ही हो' पासून सुरू झालेली अरिजीतची जादू आज प्रत्येक भारतीयाच्या प्लेलिस्टचा भाग आहे. गेल्या १५ वर्षांत त्याने बॉलिवूडला शेकडो सुपरहिट गाणी दिली. त्याच्या निवृत्तीच्या बातमीने नेटकरी भावुक झाले आहेत. काहींनी "एक पर्व संपलं" अशी प्रतिक्रिया दिली आहे, तर काहींनी "आम्ही तुला मिस करू" असं म्हणत सोशल मीडियावर 'Arijit Singh' असा हॅशटॅग ट्रेंड करायला सुरुवात केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Arijit Singh Retirement: नवीन वर्षात सर्वात मोठा धक्का! अरिजीत सिंगचा प्लेबॅक सिंगिंगला कायमचा रामराम, शॉकिंग कारण आलं समोर
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल