Mumbai News: मरण झालं स्वस्त! 9 महिन्याचं बाळ आणि 3 वर्षांच्या चिमुरडीच्या मृत्यूने मुंबई हळहळली, PHOTOS
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
विक्रोळीतील टागोर नगर परिसर आणि खेतवाडी परिसरामध्ये घडलेल्या दोन्ही घटनेमध्ये चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला आहे. या दोन्हीही घटना मन हेलावून टाकणाऱ्या असून काही लोकांच्या हलगर्जीपणामुळे दोन निष्पाप चिमुकल्या जीवांनी आपला जीव गमावला आहे. या दोन्हीही घटनांमुळे मुंबई शहर हादरले आहे.
advertisement
1/7

विक्रोळीतील टागोर नगरमधील आंबेडकर नगर परिसरात प्रजासत्ताक दिनानिमित्त लावलेला एक जड स्पीकर ३ वर्षांच्या चिमुकलीच्या अंगावर पडल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेचा अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
advertisement
2/7
२६ जानेवारीनिमित्त आंबेडकर नगरमध्ये सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी परिसरात मोठे स्पीकर्स लावले होते. यावेळी ही ३ वर्षांची मुलगी परिसरात खेळत असताना अचानक एक मोठा स्पीकर तिच्या अंगावर कोसळला.
advertisement
3/7
हा आघात इतका भीषण होता की, चिमुकली गंभीर जखमी झाली. स्थानिक नागरिकांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या दुर्घटनेमागे एका चिंध्या गोळा करणाऱ्या व्यक्तीचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे प्राथमिक आरोप होत आहेत.
advertisement
4/7
मुंबईमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी स्पीकर अंगावर पडून एका चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आणखी मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. मुंबईतील खेतवाडी परिसरात शाळेच्या बसने दिलेल्या धडकेत एक महिला नऊ महिन्यांच्या बाळासह बसखाली सापडली आहे.
advertisement
5/7
मुंबईतील खेतवाडी परिसरात संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. कुलाबा परिसरातील जे. बी. सोमण शाळेची ही बस होती. विद्यार्थ्यांना सोडून बस पुढे चालली होती. त्याच वेळी एक महिला हातात ९ महिन्याच्या बालिकेला आणि दुसऱ्या हातात चिमुरडीला घेऊन रस्ता ओलांडत होती.
advertisement
6/7
महिला मुलीला बसमधून उतरवून बसच्या समोरून घरी घेऊन चालली होती. त्याचवेळी स्कुल बस चालकाने बस पुढे घेतली. बसची धडक बसल्यामुळे महिला आणि मुलगी खाली कोसळले. काही कळायच्या आत महिला चाकाखाली सापडली तर ती मुलगी बाजूला फेकली गेली.
advertisement
7/7
या घटनेत महिलेच्या हातात ९ महिन्याची मुलगी होती. बसच्या चाकाखाली सापडून 9 महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिकांनी धाव घेऊन जखमी महिलेला बाहेर काढलं. घटनेची माहिती पोलि‍सांना देण्यात आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai News: मरण झालं स्वस्त! 9 महिन्याचं बाळ आणि 3 वर्षांच्या चिमुरडीच्या मृत्यूने मुंबई हळहळली, PHOTOS