Bollywood Love Story: 13 वर्षांनी मोठ्या शाहिदच्या प्रेमात कशी पडली मीरा? 15 मिनिटात दिला लग्नासाठी होकार!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
shahid kapoor mira rajput love story: बॉलिवूडमध्ये प्रेम, अफेअर, ब्रेकअप अशा गोष्टी सतत पहायला मिळतात. या कपल्या लव्ह स्टोरीही खूप फेमस असतात. मात्र बॉलिवूडचं असं कपल ज्यांचं लव्ह मॅरेज नाही तर अरेंज मॅरेज झालं.
advertisement
1/8

बॉलिवूडमध्ये प्रेम, अफेअर, ब्रेकअप अशा गोष्टी सतत पहायला मिळतात. या कपल्या लव्ह स्टोरीही खूप फेमस असतात. मात्र बॉलिवूडचं असं कपल ज्यांचं लव्ह मॅरेज नाही तर अरेंज मॅरेज झालं. ही अरेंजवाली लव्हस्टोरी आहे शाहिद कपूर आणि मीरा राजपूतची.
advertisement
2/8
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत यांचं अरेंज मॅरेज आहे. दोघांची भेट त्यांच्या कुटुंबातील ओळखीमुळे झाली. दोघंही राधा स्वामी सत्संग या आध्यात्मिक संस्थेशी जोडलेले होते.
advertisement
3/8
शाहिदचे वडील पंकज कपूर आणि मीराचे कुटुंब या संस्थेशी संबंधित असल्यामुळेच त्यांनी दोघांची भेट घडवून आणली. मीरा त्यावेळी दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेजमध्ये इंग्लिश ऑनर्सचे शिक्षण घेत होती, तर शाहिद बॉलीवूडमध्ये सुपरस्टार बनलेला होता.
advertisement
4/8
शाहिद आणि मीरामध्ये 13 वर्षांचं अंतर आहे, त्यामुळे पहिल्या भेटीत दोघांमध्ये थोडासा संकोच होता. पण शाहिदने मीराशी सहज संवाद साधत तिला कम्फर्टेबल केलं. मीरा देखील शाहिदच्या साध्या स्वभावाने भारावून गेली आणि दोघांनी पुढे भेटत राहायचं ठरवलं.
advertisement
5/8
शाहिद आणि मीराने फक्त काही वेळ भेटल्यानंतरच त्यांच्या नात्याला होकार दिला. त्यांच्या कुटुंबीयांनी लवकरच साखरपुडा जुलै 2015 मध्ये केला. 7 जुलै 2015 रोजी दिल्लीत एका खासगी समारंभात दोघांनी लग्न केलं.
advertisement
6/8
शाहिद मीराचा फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. नंतर मुंबईत एका ग्रँड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले, जिथे बॉलीवूडमधील अनेक मोठे सेलिब्रिटी उपस्थित होते.
advertisement
7/8
शाहिद आणि मीरा हे फक्त नवरा-बायको नसून उत्तम मित्रसुद्धा आहेत. शाहिद नेहमी सांगतो की मीरा त्याला बॉलीवूडच्या ग्लॅमरपासून दूर ठेवते आणि त्याला एक साधं, शांत आयुष्य जगायला शिकवते. मीरा राजपूतने शाहिदच्या आयुष्यात येऊन त्याला एक स्थिर, कुटुंबवत्सल आणि आनंदी आयुष्य दिलं.
advertisement
8/8
लग्नानंतर शाहिद आणि मीरा लवकरच आई-बाबा झाले. 2016 मध्ये मुलगी मिशा कपूर जन्माला आली. 2018 मध्ये मध्ये झैन कपूर जन्माला आलं. आता त्यांची एक हॅपी फॅमिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bollywood Love Story: 13 वर्षांनी मोठ्या शाहिदच्या प्रेमात कशी पडली मीरा? 15 मिनिटात दिला लग्नासाठी होकार!