TRENDING:

Deepika Padukone Net Worth: भरमसाठ फी आकारणाऱ्या दीपिकाची एकूण संपत्ती किती? आकडा चक्रावणारा

Last Updated:
Deepika Padukone Net Worth: बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री दीपिका पादुकोणचा आज वाढदिवस आहे. बॉलिवूडची ही सुंदरी 39 वर्षांची झाली आहे. आपल्या 18 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. 'ओम शांती ओम' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या डीपीविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
advertisement
1/8
भरमसाठ फी आकारणाऱ्या दीपिकाची एकूण संपत्ती किती? आकडा चक्रावणारा
बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री दीपिका पादुकोणचा आज वाढदिवस आहे. बॉलिवूडची ही सुंदरी 39 वर्षांची झाली आहे. आपल्या 18 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. 'ओम शांती ओम' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या डीपीविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
advertisement
2/8
दीपिका पदुकोण ही आघाडीची अभिनेत्री आहे. मात्र इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली, खूप नकारही पचवले. आज यशाच्या शिखरावर असलेल्या दीपिका तिच्या चित्रपटांसाठी मोठ्या प्रमाणात फी आकारते. ती तिच्या एका चित्रपटासाठी 15-20 कोटी रुपये मानधन घेते.
advertisement
3/8
चित्रपटांव्यतिरिक्त दीपिका इतर अनेक माध्यमांतून ती दरवर्षी भरघोस कमाई करते. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच दीपिका पदुकोण एक चांगली बिझनेसवुमन देखील आहे. तिची एकूण 500 कोटींची संपत्ती आहे.
advertisement
4/8
ती 2018 पासून स्वतःचे प्रोडक्शन हाऊस चालवते, ज्याचे नाव KA प्रॉडक्शन आहे. दीपिकाचा चित्रपट 'छपाक' या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनवण्यात आला आहे.
advertisement
5/8
प्रॉडक्शन हाऊससोबतच, दीपिकाचा स्वतःचा स्किन केअर ब्रँड 82°E देखील आहे. तिने 2022 मध्ये ते लाँच केले, जे फेशियल मास्क, सनस्क्रीन, मॉइश्चरायझर, लिप बाम यासारखे स्कीन केअर प्रोडक्ट तयार करते.
advertisement
6/8
याशिवाय दीपिकाचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड देखील आहे. 2019 मध्ये, 'Furlenco' नावाच्या फर्निचर भाड्याने प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक केली. त्याच वर्षी, अभिनेत्रीने ऑनलाइन सौंदर्य उत्पादनांच्या मार्केटप्लेस 'पर्पल'मध्ये देखील पैसे गुंतवले.
advertisement
7/8
2019 मध्येच, दीपिकाने पॅकेज्ड फूड स्टार्टअप ड्रम फूड्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या सीरीज सी फंडिंग फेरीत भाग घेतला होता. ती स्टार्टअपच्या फ्लेवर्ड दही ब्रँड 'एपिगॅमिया'ची ब्रँड ॲम्बेसेडर बनली.
advertisement
8/8
या अभिनेत्रीने इलेक्ट्रिक टॅक्सी स्टार्टअप 'ब्लूस्मार्ट'मध्येही पैसे गुंतवले आहेत. दीपिकाने 2020 मध्ये बेंगळुरूस्थित ट्रॅव्हल बॅग स्टार्टअप कंपनी 'मोकोबारा'मध्येही गुंतवणूक केली आहे. याशिवाय अभिनेत्रीने फॅन मेकर कंपनी 'Atomberg Technologies', Pet care platform 'Supertel' आणि 'Blue Tokai Coffee' मध्ये पैसे गुंतवले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Deepika Padukone Net Worth: भरमसाठ फी आकारणाऱ्या दीपिकाची एकूण संपत्ती किती? आकडा चक्रावणारा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल