Alia Bhatt: आलिया भट्टने बदललं आडनाव? हॉटेलच्या 'त्या' व्हायरल फोटोने उडवली खळबळ
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Alia Bhatt Changed Surname: बी-टाऊनची टॅलेंडेट आणि सुंदर अभिनेत्री आघाडीची स्टार म्हणजे आलिया भट्ट. तिने तिच्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. वैविध्यपूर्ण भूमिका साकारुन तिने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.
advertisement
1/7

बी-टाऊनची टॅलेंडेट आणि सुंदर अभिनेत्री आघाडीची स्टार म्हणजे आलिया भट्ट. तिने तिच्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. वैविध्यपूर्ण भूमिका साकारुन तिने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.
advertisement
2/7
आलिया भट्टने तिचं आडनाव बदलल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यामध्ये आलियाचं आडनाव बदललेलं दिसलं. त्यामुळे इंटरनेटवर या व्हायरल फोटोवरुन चांगलीच चर्चा रंगलीय.
advertisement
3/7
आलियाच्या नव्या व्ह्लॉगमधील एका छोट्याशा क्षणाने हे स्पष्ट केलं की आलिया ‘भट्ट’वरून ‘कपूर’ झाली आहे. फोटोमध्ये ती एका हॉटेलच्या खोलीत उभी आहे आणि मागे असलेल्या बोर्डवर लिहिलं आहे - “Dear Alia Kapoor”. बस, एवढीच झलक पुरेशी ठरली अफवा आणि चर्चांना उधाण यायला.
advertisement
4/7
मागे एकदा ‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत आलियाने स्पष्ट केलं होतं की – “माझं स्क्रीन नेम आलिया भट्टच राहील, पण मी कागदपत्रांवर नाव बदलून ‘आलिया भट्ट-कपूर’ करणार आहे.”
advertisement
5/7
ती पुढे म्हणाली होती, “मी कपूर कुटुंबाचा भाग आहे, आम्ही सगळे एकत्र प्रवास करतो. अशा वेळी मी वेगळी वाटू नये म्हणून मला वाटतं माझं नाव देखील त्यांचं असावं.”
advertisement
6/7
यानंतर चाहत्यांनी नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस पाडलाय. काहींना 'आलिया भट्ट' हे नाव सोडायला अजून वेळ लागेल असं वाटतंय. एकाने लिहिलं, “आलिया भट्ट हे नाव आता एक ब्रँड आहे, ते बदलणं अवघड वाटतंय.” तर दुसऱ्याने म्हटलं, “कपूर हे नाव खूपच सामान्य वाटतं, पण तिचा निर्णय तिने घेतला आहे.”
advertisement
7/7
दरम्यान, अद्याप आलियाने याविषयी कोणतीही अधिकृत घोषणा किंवा वक्तव्य केलं नाही. मात्र या फोटोने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Alia Bhatt: आलिया भट्टने बदललं आडनाव? हॉटेलच्या 'त्या' व्हायरल फोटोने उडवली खळबळ