'जरा डोळे तपासून घ्या', आधी गाडीने तिघांना उडवलं, CCTV व्हिडीओ व्हायरल होतोच संतापली अभिनेत्री
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Divya Suresh on Hit and Run Case : अभिनेत्री दिव्या सुरेश हिनं तिच्या कारने दुकाची स्वाराला धडक दिली. त्यानंतर अभिनेत्रीची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
advertisement
1/11

बिग बॉस फेम प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या सुरेश ही बंगळुरूमध्ये हिट अँड रन प्रकरणामुळे चर्चेत आली आहे.
advertisement
2/11
4 ऑक्टोबरच्या पहाटे दिव्या सुरेशच्या कारने एका दुचारीस्वाराला धडक दिली. ज्यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे तर इतर दोघांना किरकोळ मार लागला.
advertisement
3/11
दरम्यान अभिनेत्री दिव्या सुरेश हिनं अपघातानानंतर घटनास्थळावरून पळ काढल्याचं सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं. पीडितांनी देखील तिच्यावर असेच आरोप केलेत.
advertisement
4/11
अपघाताचा व्हिडीओ समोर आल्यानंतर तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. दिव्या सुरेशनं पीडितांची चौकशी किंवा मदत करत तिथून पळ काढला यावरून तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं.
advertisement
5/11
दरम्यान दिव्या सुरेश हिनं अपघाताच्या सीसीटीव्ही व्हिडीओचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर करत या प्रकरणावर तिची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
6/11
फ्री प्रेसशी बोलताना दिव्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, "चूक दुचाकीस्वाराची होती. ते दुचाकीवर तीन लोक होते आणि त्यातील कोणीही हेल्मेट घातले नव्हते."
advertisement
7/11
"कार डावीकडून वळत असताना दुचाकीस्वार स्वत:हून आला आणि कारला धडकला."
advertisement
8/11
"आता गाडीतील व्यक्तीला दोष देणे हा मुर्खपणा आहे. व्हिडीओ जरा नीट बघा आणि तुमचे डोळे तपासा. फक्त सेलिब्रेटी आहे म्हणून विनाकारण खोटो आरोप करू शकत नाही."
advertisement
9/11
दिव्याने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "कमेंट करणाऱ्या प्रत्येकाचे आभार. सत्यमेव जयते."
advertisement
10/11
बंगळुरूमध्ये झालेल्या या अपघातात किरण जी आणि त्याची चुलत बहिण अनुषा आणि अनिता हे तिघे दुचाकीवर होते. ता अनिता हिच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तिच्या सर्जरी करण्यात आली.
advertisement
11/11
अपघात झाला तेव्हा कारमधील दिव्या सुरेश मदतीसाठी थांबली नाही. ती निघून गेली असा आरोप पीडियांनी केला आहे. दिव्या सुरेश विरोधात हिट अँड रनची केस दाखल करण्यात आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'जरा डोळे तपासून घ्या', आधी गाडीने तिघांना उडवलं, CCTV व्हिडीओ व्हायरल होतोच संतापली अभिनेत्री