TRENDING:

Gautami Patil : 'माझं ध्येय फक्त प्रसिद्धी नव्हे...' मग करायचंय काय? गौतमी पाटीलने सांगितला तिचा फ्यूचर प्लॉन

Last Updated:
Gautami Patil Future Plan : गेली अनेक वर्ष डान्सर गौतमी पाटील महाराष्ट्रात नाव कमावतेय. पण फक्त प्रसिद्धी मिळवणं हे गौतमीचं ध्येय नाहीये. मग गौतमीला करायचं काय आहे? गौतमीनं तिचा फ्यूचर प्लान सांगितला.
advertisement
1/7
'माझं ध्येय फक्त प्रसिद्धी नव्हे...' गौतमी पाटीलने सांगितला तिचा फ्यूचर प्लॉन
गौतमी पाटील हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माहिती आहे. आपल्या डान्सनं गौतमीनं महाराष्ट्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुरूवातीच्या काळात गौतमीवर बरीच टीका करण्यात आली. पण त्या सगळ्या टीकांना समोरं जात तर कधी आपल्या चुका सुधारत आपले पाय घट्ट रोवून ठेवले.
advertisement
2/7
गौतमी पाटील नेहमीच तिच्या बिनधास्त डान्समुळे ओळखली गेली. अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केल. स्टेज शो, कार्यक्रम आणि सोशल मीडियावर तिची मोठी फॅनफॉलोविंग आहे. पण फक्त प्रसिद्धी मिळवणं हे गौतमीचं ध्येय नाहीये, असं तिनं नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं.
advertisement
3/7
गौतमीला फक्त प्रसिद्ध नकोय, मग काय हवं आहे? काय आहे गौतमीचा फ्यूचर प्लान हे तिनं एका मुलाखतीत सांगितलं.
advertisement
4/7
केवळ प्रसिद्धीपुरतं यश न मानता कला जपणं आणि तिला सन्मान मिळवून देणं हे तिचं ध्येय आहे. भविष्यात सिनेमात काम करण्यासोबतच स्वतःची डान्स अॅकॅडमी सुरू करून नव्या पिढीला योग्य दिशा देण्याचं तिचं स्वप्न आहे.
advertisement
5/7
गौतमी म्हणाली, "मला भविष्यात सिनेमात काम करण्याची इच्छा आहे पण त्यासाठी मी पूर्ण तयारीनिशी उतरेन."
advertisement
6/7
"मला माझी डान्स अॅकॅडमी सुरू करायची आहे. नव्या पिढीला योग्य दिशा द्यायची आहे. माझं ध्येय फक्त प्रसिद्धी मिळवणं नाही."
advertisement
7/7
"मला कला टिकवणं आणि तिला सन्मान मिळवून देणं तसंच मराठी संस्कृतीचं सौंदर्य जगभर पोहोचवणे हेच माझं स्वप्न आहे."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Gautami Patil : 'माझं ध्येय फक्त प्रसिद्धी नव्हे...' मग करायचंय काय? गौतमी पाटीलने सांगितला तिचा फ्यूचर प्लॉन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल