Guess Who: आजोबा राजा, पणजोबा PM, राजघराण्यात जन्मली बॉलिवूडची अप्सरा, घटस्फोटित अभिनेत्याशी थाटला संसार
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Guess Who: बॉलिवूड आणि साऊथ सिनेमात आपल्या अभिनयाची मोहिनी घालणारी अभिनेत्री केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही, तर तिच्या राजघराण्याच्या पार्श्वभूमीसाठी आणि खासगी आयुष्यातील चढ-उतारांसाठीही चर्चेत असते.
advertisement
1/9

मुंबई: बॉलिवूड आणि साऊथ सिनेमात आपल्या अभिनयाची मोहिनी घालणारी अभिनेत्री अदिती राव हैदरी ही केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही, तर तिच्या राजघराण्याच्या पार्श्वभूमीसाठी आणि खासगी आयुष्यातील चढ-उतारांसाठीही चर्चेत असते.
advertisement
2/9
अदिती आणि अभिनेता सिद्धार्थ यांची प्रेम कहाणी एखाद्या सिनेमाच्या स्क्रिप्टसारखीच वाटते, जिथे ब्रेकअपनंतर आयुष्यात पुन्हा खऱ्या प्रेमाची एन्ट्री होते.
advertisement
3/9
अदिती राव हैदरीच्या आयुष्यातील प्रवास अनेक नाट्यमय वळणांनी भरलेला आहे. खूप कमी लोकांना माहीत आहे की, अदितीचे पहिले लग्न अभिनेता सत्यदीप मिश्रा यांच्याशी झाले होते. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी तिने हा निर्णय घेतला होता.
advertisement
4/9
मात्र, हे नाते फार काळ टिकले नाही आणि लवकरच दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत अदितीने सांगितले होते की, घटस्फोटामुळे तिचे मन दुखावले होते. पण महत्त्वाचे म्हणजे, लग्न तुटले असले तरी अदिती आणि सत्यदीप यांनी आजही आपली मैत्री कायम ठेवली आहे.
advertisement
5/9
पहिला विवाह मोडल्यानंतर अदितीच्या आयुष्यात २०२१ मध्ये साऊथ सिनेमातील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ यांची एन्ट्री झाली. फेब्रुवारी २०२१ मध्ये, तेलुगू चित्रपट 'महा समुद्रम' च्या सेटवर अदिती आणि सिद्धार्थ पहिल्यांदा एकत्र दिसले. ॲक्शन-ड्रामा असलेल्या या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही सेटवर एकमेकांसोबत वेळ घालवत असत.
advertisement
6/9
याच दरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढू लागली आणि त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखल्यानंतर मार्च २०२४ मध्ये त्यांनी गुपचूप साखरपुडा केला. त्यानंतर १६ सप्टेंबर २०२४ रोजी दोघे विवाहबंधनात अडकले.
advertisement
7/9
अदितीने २० वर्षांपूर्वी 'प्रजापती' या मल्याळम चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. 'दिल्ली-६' मध्ये छोटी भूमिका करूनही तिने वेगळी ओळख निर्माण केली. 'रॉकस्टार', 'मर्डर ३', 'पद्मावत' आणि 'वझीर' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने दमदार भूमिका साकारल्या.
advertisement
8/9
संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' या वेब सीरिजमध्ये 'बिब्बोजान'चा रोल साकारून अदितीने अक्षरशः इतिहास रचला. अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यासाठी तिचे खूप कौतुक झाले आणि ती रातोरात स्टार बनली.
advertisement
9/9
आदिती रावचे आईवडील एहसान हैदरी आणि विद्या राव आहेत. तिचे पणजोबा सर अकबर हैदरी हे हैदराबादच्या निजामाचे पंतप्रधान होते. तिचे आजोबा जे. रामेश्वर राव हे हैदराबादमधील वानपार्थी या संस्थानाचे राजा होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who: आजोबा राजा, पणजोबा PM, राजघराण्यात जन्मली बॉलिवूडची अप्सरा, घटस्फोटित अभिनेत्याशी थाटला संसार