TRENDING:

'हरिश्चंद्राची फॅक्टरी'मधील छोटा मुलगा आठवतोय! आता झाला इतका मोठा, करतोय लग्न; बायकोही आहे अभिनेत्री

Last Updated:
हरिश्चंद्राची फॅक्टरी सिनेमातील छोटा मुलगा आता खूप मोठा झाला आहे. तो लग्न करतोय. त्याची बायकोही प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
advertisement
1/9
'हरिश्चंद्राची फॅक्टरी'मधील छोटा मुलगा आठवतोय! आता झाला इतका मोठा, करतोय लग्न
मराठी मनोरंजन विश्वात एक जोड्या लग्नबंधनात अडकत आहेत. अभिनेत्री पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर यांच्यानंतर आता आणखी एक जोडी लग्न करण्यासाठी सज्ज झाली आहे.
advertisement
2/9
'हरिश्चद्राची फॅक्टरी' हा मराठी सिनेमा आठवतोय! या सिनेमात दादासाहेब फाळकेंच्या सर्वात लहान मुलाची भूमिका साकारणारा चिमुरडा आठवतोय का? तो आता चांगलाच मोठा झाला असून लग्न देखील करतोय.
advertisement
3/9
अभिनेता अथर्व कर्वे असं त्याचं नाव असून त्याच्या डेटिंगची माहिती समोर आली आहे. अथर्वची होणारी बायको देखील प्रसिद्ध मालिकेत अभिनेत्री म्हणून काम करतेय. गेली सात वर्ष दोघे एकमेकांना डेट करत आहेत.
advertisement
4/9
अभिनेता अथर्व कर्वे यानं बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. एका पेक्षा एकमध्ये निवेदन, हरिश्चंद्राची फॅक्टरीमध्ये त्याने अभिनयाची छाप उमटवली.
advertisement
5/9
'एक महानायक बी आर आंबेडकर' सारख्या हिंदी मालिकेतूनही अथर्व घराघरात पोहोचला. त्याचप्रमाणे 'बालगंधर्व' सारख्या सिनेमातही त्यानं काम केलं आहे.
advertisement
6/9
स्टार प्रवाहवरील 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेतील विद्या म्हणजेच अभिनेत्री साक्षी महाजनबरोबर अथर्व कर्वे लग्न करतोय.
advertisement
7/9
'विठू माऊली' या मराठी मालिकेच्या सेटवर अथर्व आणि साक्षी यांची भेट झाली. दोघांची मैत्री झाली, प्रेमात पडले आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
8/9
अथर्व आणि साक्षी गेली 7 वर्ष रिलेशनमध्ये आहेत. येत्या फेब्रुवारी महिन्यात अथर्व आणि साक्षी लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर येत आहे.
advertisement
9/9
साक्षीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, तिने माझी माणसं, उदे ग अंबे उदे, विठू माऊली आणि आता काय होतीस तू कोण झालीस तू या मालिकेत ती काम करतेय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'हरिश्चंद्राची फॅक्टरी'मधील छोटा मुलगा आठवतोय! आता झाला इतका मोठा, करतोय लग्न; बायकोही आहे अभिनेत्री
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल