TRENDING:

Ajinkya Dev: 'माझ्या नशीबात त्यांच्यासोबत...', अजिंक्य देव यांनी सांगितला बाळासाहेब ठाकरेंसोबतचा मातोश्रीमधील 'तो' किस्सा

Last Updated:
Ajinkya Dev Movie: अजिंक्य देव सध्या त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अशातच त्यांनी एका मुलाखतीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलच्या आठवणी सांगितल्या आहेत.
advertisement
1/8
अजिंक्य देव यांनी सांगितला बाळासाहेब ठाकरेंसोबतचा मातोश्रीमधील 'तो' किस्सा
मराठी सिनेसृष्टीतील हँडसम हंक अजिंक्य देव लवकरच त्यांचा आगामी चित्रपट ‘असा मी अशी मी’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट रिलीज होण्याआधीच चर्चेत आला आहे. या सिनेमामध्ये अजिंक्य देव यांच्यासोबत तेजश्री प्रधान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
advertisement
2/8
दरम्यान, नुकतंच या सिनेमातील एक इंटिमेट सीन सोशल मीडियावर समोर आला आहे. त्यानंतर सिनेमाची जबरदस्त चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे अजिंक्य देव यांना त्यांच्यापेक्षा २५ वर्षे लहान अभिनेत्रीसोबत रोमँटिक सीन देताना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
advertisement
3/8
अजिंक्य देव सध्या त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अशातच त्यांनी एका मुलाखतीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलच्या आठवणी सांगितल्या आहेत.
advertisement
4/8
अजिंक्य देव यांचे आई-बाबा ज्येष्ठ अभिनेते रमेश देव आणि सीमा देव, यांचे मातोश्रीवर कायम येणे-जाणे असायचे. त्यामुळेच अजिंक्य यांना बाळासाहेबांचा सहवास लाभला.
advertisement
5/8
देव कुटुंबावर बाळासाहेब ठाकरेंचे खूप प्रेम होते. "मी तर लहानपणी त्यांच्या मांडीवर बसलो आहे," या शब्दात अजिंक्य देव यांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
advertisement
6/8
अजिंक्य देव मोठे झाल्यावर जेव्हा चित्रपटसृष्टीत आले, तेव्हाही त्यांनी अनेकदा बाळासाहेबांचे आशीर्वाद घेतले. पाठीवर कौतुकाची थाप मिळाल्याचे क्षण त्यांच्यासाठी अनमोल आहेत.
advertisement
7/8
अजिंक्य देव यांचे देखणे व्यक्तिमत्त्व आणि अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात त्यांची वेगळी जागा आहे. त्यांनी 'माहेरची साडी', 'सर्जा', 'कशासाठी प्रेमासाठी' आणि 'माझं घर माझा संसार' यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
advertisement
8/8
लवकरच त्यांचा ‘असा मी तशी मी’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, यात त्यांच्यासोबत अभिनेत्री तेजश्री प्रधान मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय, त्यांना रणबीर कपूरच्या 'रामायण' या बहुप्रतीक्षित चित्रपटातील भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Ajinkya Dev: 'माझ्या नशीबात त्यांच्यासोबत...', अजिंक्य देव यांनी सांगितला बाळासाहेब ठाकरेंसोबतचा मातोश्रीमधील 'तो' किस्सा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल