सतत चिडचिड करणाऱ्या जया बच्चन यांना जडलाय गंभीर आजार, स्वतः लेकीने केला खुलासा, म्हणाली 'आमची मानसिक तयारी...'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Jaya Bachchan : जया बच्चन यांना पापाराझींवर राग येण्याचं खरं कारण त्यांच्या मुलांनी 'कॉफी विथ करण' शोमध्ये सांगितलं आहे.
advertisement
1/6

सेलिब्रिटी म्हटलं की त्यांना जागोजागी स्पॉट करणारे पापाराझीही आलेच. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये, एअरपोर्टवर किंवा रेस्ट्रॉरंट्सच्या बाहेर हेच पापाराझी सेलिब्रिटींना स्पॉट करतात. मात्र, प्रत्येक सेलिब्रिटी पापाराझींना चांगलीच वागणूक देतात असं नाही.
advertisement
2/6
काही वेळेस पापाराझींना सेलिब्रिटींच्या वागणुकीचा सामना करावा लागतो. अशीच एक अभिनेत्री म्हणजे जया बच्चन. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी त्यांचा पापाराझींवरचा राग सोशल मीडियावर व्हायरल झालेला आपण पाहिला आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हे सतत का घडतं? अखेर यामागचं खरं कारण त्यांच्या मुलांनीच उघड केलं आहे.
advertisement
3/6
२०१९ मध्ये 'कॉफी विथ करण' या लोकप्रिय टॉक शोमध्ये अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन भावंडांनी हजेरी लावली होती. कार्यक्रमाच्या दरम्यान होस्ट करण जोहरने एक मनोरंजक आणि नेहमी चर्चेचा विषय असलेला प्रश्न विचारला – “तुमच्या आईला पापाराझींचा इतका राग का येतो?” त्यावर उत्तर देताना श्वेताने एक महत्त्वाचं पण तितकंच गंभीर कारण शेअर केलं.
advertisement
4/6
श्वेता म्हणाली, “मी एकदा आईला विचारलं होतं की, तू इतकी चिडतेस का? त्यावर ती माझ्यावरच भडकली. म्हणाली, 'तुम्हाला काही कळत नाही. फक्त मजा घेता आणि खिल्ली उडवता.'” जया बच्चन यांना खरं तर क्लॉस्ट्रोफोबिया असल्याचं श्वेताने सांगितलं. “जेव्हा त्यांच्या आजूबाजूला खूप लोक असतात, कॅमेरे असतात, त्या क्षणी त्यांना गुदमरल्यासारखं वाटतं. मग ते लोक जवळ असोत की दूर, त्या अस्वस्थ होतातच.”
advertisement
5/6
अभिषेक बच्चननेही त्यांच्या कुटुंबातील अशा प्रसंगांविषयी सांगितलं. “जेव्हा मी, आई, बाबा आणि ऐश्वर्या कुठेही एकत्र जातो, तेव्हा आम्ही आधीच मानसिक तयारी करतो. कारण पापाराझी कधी, कुठून, काय करतील हे सांगता येत नाही. पण आम्ही श्वेताला कायम आईबरोबर ठेवतो. कारण ती आईला समजून घेते आणि तिला व्यवस्थित सांभाळते,” असं अभिषेकने स्पष्ट केलं.
advertisement
6/6
यावेळी श्वेताने एक मुद्दा अधोरेखित केला, “पूर्वी पापाराझी फार नव्हते. आता प्रत्येकजण फोटो काढू पाहतो. पण ते करत असताना आधी विचारून फोटो काढा. थोडा आदर ठेवा.” जया बच्चन यांचा राग हा अहंकारामुळे नसून आजारामुळे असल्याचं त्यांच्या मुलांच्या बोलण्यातून स्पष्ट होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सतत चिडचिड करणाऱ्या जया बच्चन यांना जडलाय गंभीर आजार, स्वतः लेकीने केला खुलासा, म्हणाली 'आमची मानसिक तयारी...'