TRENDING:

Kajol : लेकीला सल्ला द्यायला गेली अन् स्वतःच तोंडावर पडली काजोल; न्यासानं दिलेल्या 'या' उत्तराची होतेय चर्चा

Last Updated:
बॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री काजोल सध्या तिच्या मुलीमुळे चर्चेत आहे. नुकतंच तिने तिच्या न्यासाविषयी मोठा खुलासा केला आहे.
advertisement
1/8
लेकीला सल्ला द्यायला गेली अन् स्वतःच तोंडावर पडली काजोल; न्यासानं दिलं असं उत्तर
काजोल नेहमीच तिच्या हटके स्टाईल आणि परखड वक्तव्यांसाठी ओळखली जाते. तिच्याप्रमाणे तिची मुलगीही चर्चेत असते.
advertisement
2/8
अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासादेखील सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असते.
advertisement
3/8
काजोलची लाडकी लेक न्यासा देवगण ही सोशल मीडियावरील लोकप्रिय सेलिब्रेटी आहे.तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
advertisement
4/8
अलीकडेच, एका इंस्टाग्राम स्टोरीमध्ये काजोलने तिची मुलगी न्यासा देवगनसोबत झालेल्या संभाषणाचा उल्लेख केला आणि तिला तिची वागणूक सुधारण्यास सांगितले. मात्र, नंतर त्याला तिच्या लेकीनं दिलेलं उत्तरही चांगलंच चर्चेत आलं आहे.
advertisement
5/8
काजोलनं न्यासाशी संबंधित एक किस्सा शेअर केला आहे. काजोलनं एकदा तिच्या मुलीला तिचा जो अॅटिट्युड आहे त्यात बदल करण्याचा सल्ला दिला होता. त्यावर तिच्या मुलीनं दिलेली प्रतिक्रिया जशास तसं उत्तर होते.
advertisement
6/8
न्यासानं काजोलच्या त्या सल्ल्यावर तिला उत्तर देताना म्हटले होते की, 'ज्यांना माझ्या अॅटिट्युडविषयी काही शंका आहे त्यांनी माझ्या निर्मात्यांशी संपर्क साधावा.' काजोलनं न्यासाने दिलेल्या या उत्तराचं कौतुक केलं आहे.
advertisement
7/8
एका मुलाखतीमध्ये काजोलनं म्हटलं होतं की, मी खूपच त्रस्त होते. मी न्यासाला म्हटले होते तुलाही तुझ्यासारखीच मुलगी होवो...त्यावर न्यासा म्हणाली होती की, मला मुलगी नको तर मुलगा हवा आहे. कारण मी माझ्यासारखी मुलगी सांभाळू शकत नाही हे मला माहिती आहे.
advertisement
8/8
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, काजोल अलीकडेच 'द ट्रायल' या मालिकेत दिसली होती, ज्यामध्ये तिने वकिलाची भूमिका केली होती. ती 'लस्ट स्टोरीज 2' या फिल्मच्या एका सेगमेंटमध्येही दिसली होती. अभिनेत्री आता तिच्या पुढच्या 'दो पट्टी' या चित्रपटातही दिसणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Kajol : लेकीला सल्ला द्यायला गेली अन् स्वतःच तोंडावर पडली काजोल; न्यासानं दिलेल्या 'या' उत्तराची होतेय चर्चा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल