Kantara Chapter 1 Collection : ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर 2' समोर संपूर्ण बॉलिवूड ठरलं फेल, पहिल्या दिवशी छापले इतके कोटी
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Kantara Chapter 1 Day One Box Office Collection : 'कांतारा: चॅप्टर 1' ने पहिल्या दिवशी जबरदस्त कमाई केली आहे. सिनेमासमोर संपूर्ण बॉलिवूड फेल झालंय. पहिल्या दिवशी किती कमाई केली आहे पाहूयात.
advertisement
1/10

ऋषभ शेट्टीचा बहुप्रतिक्षित 'कांतारा: चॅप्टर 1' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा 2022 मध्ये आलेल्या 'कांतारा' चित्रपटाचा प्रीक्वल आहे.
advertisement
2/10
दसऱ्याला प्रदर्शित झालेला हा चित्रपट केवळ आतापर्यंतच्या सर्वात हाय-प्रोफाइल कन्नड चित्रपटांपैकी एक नाही तर संपूर्ण भारतात प्रदर्शित होणारा चित्रपट आहे.
advertisement
3/10
चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. छावाला टक्कर देत सिनेमानं पहिल्याच दिवशी अपेक्षेप्रमाणे तगडी कमाई करण्यात यश मिळवलं आहे.
advertisement
4/10
या वर्षीच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'सैयारा' 22 कोटी, 'सिकंदर' 26 कोटी आणि 'छावा' 31 कोटीच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनला 'कांतारा: चॅप्टर 1'ने मागे टाकलं आहे.
advertisement
5/10
ACNILC च्या अहवालानुसार, 'कांतारा: चॅप्टर 1' ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 65.3 कोटींची कमाई केली आहे.
advertisement
6/10
एवढेच नाही तर, त्याने रजनीकांतच्या 'कुली'च्या पहिल्या दिवसाच्या कमाईला मागे टाकलं आहे. 'कुली'ने पहिल्या दिवशी 65 कोटींची कमाई केली होती.
advertisement
7/10
'कांतारा: चॅप्टर 1' ची ही कमाई रात्री 10 वाजेपर्यंत अंदाजे आहे. चित्रपटाने अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली आहे.
advertisement
8/10
पहिल्या दिवसाच्या अँडवान्स बुकिंगवरून असे दिसून आले की तो फक्त 40 कोटींनी ओपनिंग करेल. पण लाँग विकेंड आणि नॅशनल हॉलिडेचा फायदा चित्रपटाला झाला.
advertisement
9/10
'कांतारा: चॅप्टर 1' चं ओपनिंग कलेक्शन खूपच प्रभावी आहेत. कांतारा हा एक नॉर्मल मसाला असलेला अ‍ॅक्शन चित्रपट नाहीये.
advertisement
10/10
चित्रपटाचं दिग्दर्शन ऋषभ शेट्टी यानं केलं आहे. रुक्मिणी वसंत ही मुख्य अभिनेत्री आहे तर गुलशन देवैया नकारात्मक भूमिकेत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Kantara Chapter 1 Collection : ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर 2' समोर संपूर्ण बॉलिवूड ठरलं फेल, पहिल्या दिवशी छापले इतके कोटी