क्रांती रेडकरने अखेर दाखवला लेकींचा चेहरा, पण जुळ्या बहिणींमधील छबील कोण आणि गोदो कोण?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
क्रांती रेडकरच्या दोन्ही मुलींचा चेहरा पहिल्यांदा सगळ्यांच्यासमोर आला. पण जुळ्या बहिणींमधील छबील कोण आणि गोदो कोण?
advertisement
1/9

बॉलिवूडच्या स्टारकिड्सबद्दल सगळ्यांनाच कुतूहल वाटत आलं आहे. अगदी अभिषेक बच्चनपासून, अलिकडचे आलिया, रणबीर ते तैमूर आणि जेह पर्यंत. बॉलिवूडच्या स्टारकिड्सच सगळ्यांनाच कौतुक वाटत आलं आहे.
advertisement
2/9
पण मराठीतही स्टारकिड्सची काही कमी नाही. अशाच दोन स्टारकिड म्हणजे अभिनेत्री क्रांती रेडकरच्या मुली छबील आणि गोदो. गेली अनेक वर्ष कॅमेरामागे असणाऱ्या छबील आणि गोदो अखेर कॅमेरासमोर आल्या आहेत. अभिनेत्री क्रांती रेडकरनं तिने दोन्ही जुळ्या मुलींचा चेहरा अखेर तिच्या लाडक्या चाहत्यांना दाखवला आहे.
advertisement
3/9
अभिनेत्री क्रांती रेडकर हिनं IRS ऑफिसर समीर वानखेडे यांच्याशी लग्न केलं. क्रांती आणि समीर यांना दोन जुळ्या आहेत. मुलींच्या जन्मानंतर क्रांती अनेक वर्ष मोठ्या स्क्रिनपासून दूर आहे. पण सोशल मीडियावर मात्र ती खूप सक्रीय असते. मुली थोड्या मोठ्या झाल्यानंतर तिने त्यांचे दररोजच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगायला सुरुवात केली.
advertisement
4/9
क्रांतीचा ह्युमर आणि तिची गोष्ट सांगण्याची पद्धत चाहत्यांना प्रचंड आवडली. तिच्या मुली म्हणजेच छबील आणि गोदो यांचे कारनामे चाहत्यांना आवडले. पण सगळ्या व्हिडीओमध्ये क्रांतीनं कधीच मुलींचे चेहरे दाखवले नाहीत. त्यामुळे क्रांतीच्या मुली नेमक्या कशा दिसतात हे जाणून घेण्याची उत्सुकचा प्रचंड उत्सुकता होती.
advertisement
5/9
अभिनेत्री पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर यांच्या लग्नात क्रांतीने सहपरिवार हजेरी लावली होती. लग्नात पहिल्यांदा छबील आणि गोदो यांचा चेहरा पहिल्यांदा चाहत्यांसमोर आला. छबील आणि गोदोला पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
advertisement
6/9
त्यानंतर क्रांती देखील ऑफिशिअलरी तिच्या इन्स्टाग्रामवर छबील आणि गोदोचा व्हिडीओ शेअर करत त्यांचा चेहरा चाहत्यांसमोर आणला. छबील आणि गोदो यांचा चेहरा तर चाहत्यांना दिसला पण या दोन जुळ्या बहि‍णींपैकी छबील कोण गोदो कोण? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
advertisement
7/9
क्रांतीची एक मुलगी मातृमुखी म्हणजेच क्रांतीसारखी दिसते. तर दुसरी मुलगी ही पितृमुखी म्हणजेच समीर वानखेडे यांच्यासारखी दिसते. दोघींच्या साधना कट हेअर स्टाइलमध्ये त्या खूप क्यूट दिसतात.
advertisement
8/9
मातृमुखी म्हणजेच क्रांतीची डिट्टो कॉपी असलेली मुलगी छबील आहे. पितृमुखी आणि समीर वानखेडे यांच्यासारखी दिसणारी मुलगी म्हणजे गोदो आहे.
advertisement
9/9
2018 साली क्रांती रेडकर दोन मुलींची आई झाली. छबिल आणि गोदो यांची खरं नाव झिया आणि झायदा अशी आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
क्रांती रेडकरने अखेर दाखवला लेकींचा चेहरा, पण जुळ्या बहिणींमधील छबील कोण आणि गोदो कोण?