...तर 'नवरा माझा नवसाचा'मध्ये दिसला असता लक्ष्या, पण कुठे बिनसलं? पिळगावकरांनी सांगितलं कारण
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Sachin Pilgaonkar - Laxmikant Berde : दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डेही नवरा माझा नवसाचा या कल्ट कॉमेडी सिनेमाचे भाग असते. सचिन पिळगावकर यांना लक्ष्याला सिनेमात घ्यायचं होतं. पण कुठे बिनसलं?
advertisement
1/8

सचिन पिळगावकर </a>यांनी मराठी सिनेसृष्टीला अनेक दर्जेदार सिनेमे दिले. आजही त्यांचे सिनेमे तितक्याच आवडीनं पाहिले जातात. त्यातील एक सिनेमा म्हणजे 'नवरा माझा नवसाचा'." width="960" height="960" /> अभिनेते सचिन पिळगावकर यांनी मराठी सिनेसृष्टीला अनेक दर्जेदार सिनेमे दिले. आजही त्यांचे सिनेमे तितक्याच आवडीनं पाहिले जातात. त्यातील एक सिनेमा म्हणजे 'नवरा माझा नवसाचा'.
advertisement
2/8
या सिनेमाचा दुसरा पार्ट काही महिन्यांआधी रिलीज झाला. ज्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. नवरा माझा नवसाचा हा मराठीतील काही कल्ट सिनेमांपैकी हा एक सिनेमा आहे.
advertisement
3/8
तुम्हाला माहिती आहे का दमदार स्टार कास्ट असलेल्या या सिनेमात दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे देखील असणार होते. पण असं काय झालं ज्यामुळे लक्ष्या या सिनेमाचा भाग होऊ शकले नाहीत. सचिन पिळगावकर यांनी स्वत: यामागचं कारण सांगितलं.
advertisement
4/8
एका मुलाखतीत बोलताना सचिन पिळगावकर यांनी सांगितलं, "मी लक्ष्याला खूप मिस करतो. नवरा माझा नवसाचा हा सिनेमा 2005 मध्ये रिलीज झाला. 2004 साली मी तो तयार केला."
advertisement
5/8
"या सिनेमात मला लक्ष्मीकांतला घ्यायचं होतं. पण त्याच्या तब्येतीमुळे मी त्याला घेऊ शकलो नाही. त्यानेच मला नकार दिला."
advertisement
6/8
"तो मला म्हणाला, तू म्हणतोय त्याचा मला आनंद आहे. पण मला डॉक्टरांनी परवानगी दिलेली नाही. त्यामुळे लक्ष्या या सिनेमात नव्हता. दुर्दैवानं डिसेंबर 2004मध्ये तो आपल्याला सोडून गेला.
advertisement
7/8
ते पुढे म्हणाले, "फक्त मी नाही तर संपूर्ण इंडस्ट्री त्याला मिस करते. माझं मिस करणं फक्त इंडस्ट्रीला मर्यादित ठेवून नाही तर माझ्या वैयक्तिक आयुष्यातही मी त्याला मिस करतो."
advertisement
8/8
सचिन पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अशी ही बनवा बनवी, भुताचा आऊ, एका पेक्षा एक, आयत्या घरात घरोबा सारख्या सुपरहिट सिनेमात एकत्र काम केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
...तर 'नवरा माझा नवसाचा'मध्ये दिसला असता लक्ष्या, पण कुठे बिनसलं? पिळगावकरांनी सांगितलं कारण