Fashion Tips : इंडियन वेअरला द्यायचाय मॉडर्न ट्विस्ट, 'या' छोट्या ट्रिक्स देतील 'WOW' लुक
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
भारतीय पोशाख नेहमीच आपल्या संस्कृती आणि परंपरेचा भाग राहिले आहेत. साड्या, कुर्ते आणि लेहेंगा हे पोशाख आजही खूप लोकप्रिय आहेत. पण, अनेकदा पारंपरिक कपड्यांना आधुनिक आणि ट्रेंडी लुक देण्याची इच्छा असते.
advertisement
1/7

भारतीय पोशाख नेहमीच आपल्या संस्कृती आणि परंपरेचा भाग राहिले आहेत. साड्या, कुर्ते आणि लेहेंगा हे पोशाख आजही खूप लोकप्रिय आहेत. पण, अनेकदा पारंपरिक कपड्यांना आधुनिक आणि ट्रेंडी लुक देण्याची इच्छा असते. काही सोप्या फॅशन ट्रिक्स वापरून तुम्ही तुमच्या पारंपरिक कपड्यांना एक नवा आणि स्टाइलिश ट्विस्ट देऊ शकता.
advertisement
2/7
साडीसोबतचा प्रयोग: तुमच्या पारंपरिक साडीला एक वेगळा लुक देण्यासाठी साडीसोबत ब्लाउजऐवजी क्रॉप टॉप, टी-शर्ट किंवा शर्ट घाला. यामुळे साडीला एक आधुनिक आणि कम्फर्टेबल लुक मिळेल.
advertisement
3/7
ज्वेलरीमध्ये बदल: पारंपरिक कपड्यांसोबत जड आणि जुने दागिने घालण्याऐवजी, आधुनिक आणि मिनिमल ज्वेलरी निवडा. उदाहरणार्थ, मोठ्या झुमक्यांऐवजी छोटे स्टड किंवा एका हातात एकच आकर्षक ब्रेसलेट घाला. ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीही पारंपरिक कपड्यांसोबत चांगली दिसते.
advertisement
4/7
फूटवेअरचा योग्य वापर: पारंपरिक चप्पलऐवजी तुमच्या लेहेंगा किंवा कुर्ता-पायजामासोबत स्नीकर्स किंवा बूट घाला. हा फ्यूजन लुक तुम्हाला खूप स्टायलिश बनवेल.
advertisement
5/7
जॅकेट आणि बेल्ट वापरा: तुमच्या कुर्त्यासोबत किंवा साडीसोबत एखादे जॅकेट किंवा वेस्ट घाला. साडीवर किंवा वन-पीस कुर्त्यावर एक आकर्षक बेल्ट वापरून तुम्ही तुमच्या कंबरेला एक चांगला आकार देऊ शकता.
advertisement
6/7
दुप्पट्टा आणि दुपट्टाची स्टाईल: केवळ पारंपरिक पद्धतीने दुप्पट्टा घेण्याऐवजी तो एका खांद्यावर स्कार्फसारखा घ्या. यामुळे तुम्हाला एक कॅज्युअल आणि आधुनिक फील मिळेल.
advertisement
7/7
मेकअप आणि हेअरस्टाइल: तुमच्या आउटफिटनुसार मेकअप आणि हेअरस्टाइलमध्ये बदल करा. बोल्ड लिपस्टिक आणि कमीत कमी मेकअप केल्याने तुमचा लुक मॉडर्न दिसेल. मोकळ्या केसांची हेअरस्टाइल किंवा मेसी बन तुमच्या पारंपरिक कपड्यांना एक वेगळा ट्विस्ट देईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Fashion Tips : इंडियन वेअरला द्यायचाय मॉडर्न ट्विस्ट, 'या' छोट्या ट्रिक्स देतील 'WOW' लुक