TRENDING:

Madhuri Dixit Sisters : पूजा दीदीपेक्षा ग्लॅमरस दिसतात माधुरी दीक्षितच्या सख्ख्या बहिणी, करतात काय?

Last Updated:
Madhuri Dixit Sisters : 'हम आपके हैं कौन' सिनेमात अभिनेत्री रेणुका शहाणेनं तिच्या बहिणीची भुमिका साकारली होती. पण तुम्ही माधुरीच्या सख्ख्या बहिणींना पाहिलं का? दिसतात माधुरी इतक्याच सुंदर.
advertisement
1/8
पूजा दीदीपेक्षा ग्लॅमरस दिसतात माधुरी दीक्षितच्या सख्ख्या बहिणी, करतात काय?
अभिनेत्री माधुरी दीक्षित ही बॉलिवूडची सर्वात टॅलेंटेड अभिनेत्रींपैकी एक आहे. माधुरी आता विश्वात आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. माधुरीची मिसेस देशपांडे ही सीरिज लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. वयाच्या 57 व्या वर्षी माधुरी तिच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सज्ज झाली आहे.
advertisement
2/8
माधुरी फक्त तिच्या अभिनयामुळे नाही तर तिच्या नृत्यामुळेही ओळखली गेली. तर दुसरीकडे सर्वसामान्य घरातील मुलगी असलेल्या माधुरीच्या सौंदर्यावर तर दुनिया फिदा झाली. माधुरीच्या अबाधित सौंदर्याला टक्कर देणारी अशी अभिनेत्री आजपर्यंत बॉलिवूडमध्ये आली नाही असं म्हणतात.
advertisement
3/8
माधुरीच्या सौंदर्याच्या प्रेमात असलेल्या तिच्या लाखो चाहत्यांना हे माहिती आहे का की माधुरीला दोन सख्ख्या बहिणी असून दोघेही माधुरी इतक्याच किंबहुना तिच्यापेक्षाही सुंदर दिसतात. पण दोघीही अनेक वर्ष लाइमलाइटपासून दूर आहेत.
advertisement
4/8
माधुरीची आई म्हणजेच स्नेहलता दीक्षित आणि शंकर दीक्षित यांना चार मुलं. तीन मुली आणि एक मुलगा, त्यात माधुरी सगळ्यात छोटी मुलगी. माधुरीला दोन मोठ्या बहिणी आहेत. एकीचं नाव रुपा दीक्षित तर दुसरी भारती दीक्षित. तीन बहिणींना एक भाऊ आहे त्याचं नाव अजित दीक्षित आहे.
advertisement
5/8
माधुरी एका मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन कुटुंबातील मुलगी आहे. माधुरीनं सिनेमाच्या ग्लॅमरस दुनियेत करिअर करण्याचा निर्णय घेतला मात्र तिची तिन्ही भावंड या जगापासून नेहमीच दूर राहिली.
advertisement
6/8
माधुरीच्या बहिणी रुपा आणि भारती दोघांनी कधीच सिनेमात काम केलं नाही पण दोघेही दिसायला खूप सुंदर आहेत. माधुरीसारख्याच दोघींनाही नृत्याची आवड आहे. दोघींनी माधुरीबरोबर लहानपणापासून कथ्थक नृत्याचं शिक्षण घेतलं आहे.
advertisement
7/8
माधुरीची नृत्याची आवड तिला अभिनयाच्या जगात घेऊन आली तर तिच्या दोन्ही बहिणींनी मात्र त्यांच्या करिअरच्या वेगळ्या वाटा निवडल्या. माधुरीची बहिण रूपा दीक्षित एक सॉफ्टवेअर आर्किटेक्ट आहे. तर दुसरी बहिण भारती दीक्षित एक कम्प्युटर इंजिनिअर आहे.
advertisement
8/8
माधुरीने देखील सुरुवातीच्या काळात वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला होता. पण नृत्य आणि अभिनयाची ओढ तिला तिथे थांबू देत नव्हती. माधुरीनं नृत्य आणि अभिनय क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Madhuri Dixit Sisters : पूजा दीदीपेक्षा ग्लॅमरस दिसतात माधुरी दीक्षितच्या सख्ख्या बहिणी, करतात काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल