Madhuri Dixit : माधुरी दीक्षितची ती गोष्ट, ज्यावर एकेकाळी सगळेच फिदा होते, आता त्यालाच घाबरू लागले
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Madhuri Dixit : अभिनेत्री माधुरी दीक्षितची ती एक गोष्ट ज्यावर प्रेक्षकांनी अनेक वर्ष प्रेम केलं. पण आज तिची ती एक गोष्ट प्रेक्षकांच्या मनात धडकी भरवतेय.
advertisement
1/7

बॉलिवूडची 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित नेहमीच तिच्या अभिनय आणि डान्समुळे चर्चेत राहिली. माधुरी आजही प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे. अभिनय, नृत्य आणि माधुरीची आणखी एक खास गोष्ट ज्यावर लाखो लोक अनेक वर्षांपासून फिदा आहेत. पण आता माधुरीच्या त्याच गोष्टीची प्रेक्षकांना भीती वाटू लागली आहे.
advertisement
2/7
अलीकडेच माधुरीची आगामी वेब सीरिज 'मिसेस देशपांडे'च्या ट्रेलर रिलीज झाला आहे. या सीरिजमध्ये माधुरीचा आतापर्यंत कधीही न पाहिलेला अवतार समोर आला आहे. या सीरिजमध्ये माधुरी एका सीरियल किलरच्या भूमिकेत दिसत आहे.
advertisement
3/7
माधुरी सीरियल किलरची भूमिका साकारू शकते असा विचारही तिच्या चाहत्यांनी कधी स्वप्नातही केला नसेल. पण मिसेस देशपांडेमध्ये माधुरीला पाहून सगळेच शॉक झाले. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे ती हत्या करतानाही खूनशी हसताना दाखवली आहे. तो सीन खूपच अंगावर येणार आहे.
advertisement
4/7
माधुरी दीक्षित तिच्या स्माइलसाठी कायम चर्चेत राहिली आहे. तिच्या गोड, निरागस हास्यावर चाहत्यांना नेहमीच प्रेम केलं. अनेक वर्षांपासून माधुरीची स्माईल तिची ओळख बनली होती. मात्र मिसेस देशपांडेमध्ये माधुरीची स्माइल पाहून प्रेक्षक घाबरलेत.
advertisement
5/7
ट्रेलरमध्ये माधुरीचा एक सीन असा आहे, जिथे ती व्यक्तीला मारल्यानंतर हसताना दिसते. तिच्या या थंडगार आणि रहस्यमय स्माईलकडे पाहून अनेकांना धक्का बसला. "जी स्माईल पाहून आम्ही मोठे झालो, तीच स्माईल आता भीतीदायक वाटायला लागली" अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
advertisement
6/7
खरंतर हे सगळं माधुरीच्या दमदार अभिनयाचं कौतुकच आहे. जिच्या एका स्माईलने लाखो लोकांना अनेक वर्ष धरून ठेवलं तीच अभिनेत्री आता एका वेगळ्या आणि गडद भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे. चाहत्यांनी तिच्या या नव्या अवताराचं स्वागत केलं आहे. "ही स्माईल नाही ही तिच्या अभिनयाची जादू आहे", असं म्हणत अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे.
advertisement
7/7
'मिसेस देशपांडे' ही क्राइम थ्रीलर सीरिज आहे. माधुरीचा हा वेगळा अंदाज प्रेक्षकांना अक्षरशः थरकाप उडवणारा आहे. तिच्या या भूमिकेमुळे पुन्हा एकदा ती सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Madhuri Dixit : माधुरी दीक्षितची ती गोष्ट, ज्यावर एकेकाळी सगळेच फिदा होते, आता त्यालाच घाबरू लागले