'माझ्याशी पंगा घेणं महागात पडेल', धर्मेंद्र यांच्या धमकीने अंडरवर्ल्डचा उडालेला थरकाप, एका कॉलमध्ये हवा टाइट
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Dharmendra : बॉलिवूडवर अंडरवर्ल्डचा दबदबा असतानाही, धर्मेंद्र आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कधीही या गुंडांना भीक घातली नाही, उलट त्यांनी अंडरवर्ल्डला खुलेआम आव्हान दिले होते.
advertisement
1/8

मुंबई: पडद्यावर 'ही-मॅन' म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे खऱ्या आयुष्यातही तितकेच धाडसी आणि बेधडक होते. बॉलिवूडवर अंडरवर्ल्डचा दबदबा असतानाही, धर्मेंद्र आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कधीही या गुंडांना भीक घातली नाही, उलट त्यांनी अंडरवर्ल्डला खुलेआम आव्हान दिले होते. अभिनेता-दिग्दर्शक सत्यजीत पुरी यांनी नुकताच धर्मेंद्र यांच्या हिंमतीचा एक थरारक किस्सा सांगितला.
advertisement
2/8
सत्यजीत पुरी यांनी 'फ्रायडे टॉकीज'ला दिलेल्या मुलाखतीत तो काळ आठवला, जेव्हा बॉलिवूडमध्ये अंडरवर्ल्डचे हस्तक्षेप वाढले होते. तेव्हा अनेक कलाकार अंडरवर्ल्डच्या एका फोन कॉलने घाबरून जायचे. पण धर्मेंद्र मात्र याला अपवाद होते. सत्यजीत पुरी म्हणाले, "धर्मेंद्र आणि त्यांच्या कुटुंबाने कधीही अंडरवर्ल्डची भीती बाळगली नाही."
advertisement
3/8
एकदा अंडरवर्ल्डच्या लोकांनी धर्मेंद्र यांच्याशी पंगा घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा धर्मेंद्रने त्यांना थेट धमकी दिली. ते म्हणाले होते, "तुम्ही जर इथे आलात, तर माझ्यासाठी अख्खा पंजाब येईल. तुमच्याकडे १० गुंड असतील, पण माझ्याकडे अख्खी आर्मी आहे. मी एकदा बोललो, तरी ट्रक भरून लोक पंजाबमधून लढायला येतील. तुम्ही माझ्याशी पंगा घेऊ नका!" या धमकीनं अंडरवर्ल्डचे लोक अक्षरशः भेदरले आणि त्यांनी पुन्हा कधीच धर्मेंद्र यांच्याशी वाद घालण्याचे धाडस केले नाही.
advertisement
4/8
धर्मेंद्र यांच्या धाडसाचे आणखी एक उदाहरण सत्यजीत पुरी यांनी सांगितले. एकदा एका चाहत्याने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला होता, पण धर्मेंद्र यांनी एका मिनिटात त्या हल्लेखोराला पकडले. पुरी म्हणाले की, आजकाल अभिनेते सहा-सहा बॉडीगार्ड घेऊन फिरतात, पण त्यावेळी धर्मेंद्र आणि विनोद खन्नांसारखे कलाकार खुल्लमखुल्ला फिरायचे.
advertisement
5/8
"धर्मेंद्र, सनी आणि बॉबी देओल यांच्यापेक्षा अधिक धाडसी कोणी नाही," असे सत्यजीत पुरी यांनी सांगितले. 'गुलामी' चित्रपटादरम्यान घडलेला एक प्रसंग सांगताना ते म्हणाले, "मी त्या चित्रपटात त्यांचा सहायक होतो. एका शॉटसाठी घोड्याला राजवाड्याच्या संगमरवरी पायऱ्यांवर चढायचे होते. धर्मेंद्रजींचा डुप्लिकेट तयार होता, पण त्यांनी स्वतःच हा सीन करण्यावर अट्टहास धरला. त्यांनी फक्त घोड्याच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यास सांगितले."
advertisement
6/8
सत्यजीत यांनी पुढे सांगितले, "पण घोड्याने नेमक्या त्याच जागेवर लघवी केली आणि कोणाच्याही लक्षात आले नाही. त्यामुळे त्या पायऱ्या अत्यंत निसरड्या झाल्या. धर्मेंद्रजी घोडेस्वारी करताना त्यांचा पाय फुटरेस्टमध्ये ठेवत नाहीत, ते घोडा फ्रीस्टाईल चालवतात. पण घोडा जसजसा चढू लागला, तसा तो घसरला. मी पाहिले की, धर्मेंद्रजींनी त्यांचा डावा पाय जमिनीवर जोरात लावून धरला आणि घोड्याने स्वतःला सावरले व तो उभा राहिला."
advertisement
7/8
या घटनेनंतर धर्मेंद्र इतके संतापले होते की, त्यांनी चित्रपटाच्या असिस्टंटला मारण्यासाठी शोधू लागले. पुरी म्हणाले, "त्या क्षणी ते इतके रागात होते की, त्यांनी एका असिस्टंटची कॉलर पकडली, पण तो कसातरी बचावला. नंतर ते घोड्याला मारायला गेले, पण त्यांनी स्वतःला आवरले. त्या एका क्षणात धर्मेंद्र यांच्या आजूबाजूला कोणीही नव्हते, सर्वजण पळून गेले."
advertisement
8/8
इतक्या धोकादायक परिस्थितीतून बाहेर पडल्यानंतरही धर्मेंद्र यांना स्वत:पेक्षा जास्त घोड्याची काळजी होती. सत्यजीत यांनी शेवटी सांगितले, "शांत झाल्यावर त्यांनी घोड्याच्या मालकाला २०० रुपये दिले, कारण घोडा घसरला होता, त्यामुळे त्याला दुखापत झाली असेल. ते स्वतःची नाही, तर त्या घोड्याची चिंता करत होते."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'माझ्याशी पंगा घेणं महागात पडेल', धर्मेंद्र यांच्या धमकीने अंडरवर्ल्डचा उडालेला थरकाप, एका कॉलमध्ये हवा टाइट