TRENDING:

'दख्खनचा राजा ज्योतिबा' आता दिसणार नरसिंह अवतारात, BIGG BOSS फेम अभिनेत्याला ओळखलंत का! PHOTO

Last Updated:
Marathi Serial : 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत नरसिंहाचा अवतार घेऊन राया आता त्याच्या माणसांचं रक्षण करताना दिसणार आहे.
advertisement
1/7
'दख्खनचा राजा ज्योतिबा' आता दिसणार नरसिंह अवतारात PHOTO
'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे.
advertisement
2/7
'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत नरसिंहाचा अवतार घेऊन राया आता त्याच्या माणसांचं रक्षण करताना दिसणार आहे. अंगावर रोमांचं आणणारा हा प्रसंग शूट करण्यासाठी 'येड लागलं प्रेमाचं'च्या संपूर्ण टीमने बरीच मेहनत घेतली आहे.
advertisement
3/7
'येड लागलं प्रेमाचं' मालिकेसाठी धारण केलेल्या नरसिंह अवताराबद्दल सांगताना राया म्हणजेच अभिनेता विशाल निकम म्हणाला,"मी स्वत:ला नशीबवान समजतो की मला विविधरंगी भूमिका साकारण्याची संधी मिळत आहे. दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेत जोतिबा साकारल्यानंतर आता येड लागलं प्रेमाचं मालिकेच्या निमित्ताने नरसिंह अवतार साकारायला मिळणार आहे".
advertisement
4/7
प्रोस्थॅटिकचा मेकअपचा आधार घेत हा नरसिंहाचा अवतार साकारण्यात आला. दोन अडीच तासांच्या मेहनतीनंतर हे रुप साकारलं गेलं.
advertisement
5/7
विशालने आठवडाभर आधीपासून या सीनची तयारी केली. त्याच्यासाठी हा सीन शूट करताना सर्वात महत्त्वाचं आव्हान होतं ते म्हणजे तो काही खाऊ शकणार नव्हता. दिवसभर तो फक्त पाणी आणि ज्यूस पित होता.
advertisement
6/7
विशालचं हे नरसिंहाचं रूप प्रेक्षकांना किती आवडतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
advertisement
7/7
विशाल निकम हा मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. 'दख्खनचा राजा ज्योतिबा' आणि 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेच्या माध्यमातून त्याला विशेष लोकप्रियता मिळाली. 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वाचा तो विजेता होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'दख्खनचा राजा ज्योतिबा' आता दिसणार नरसिंह अवतारात, BIGG BOSS फेम अभिनेत्याला ओळखलंत का! PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल