Varinder Ghumman Death : हृदयसारखा धडधडत होता हात, काळनिळं पडलं शरीर; वरिंदर घुम्मनला नेमकं काय झालं होतं? मित्राने सांगितलं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Varinder Ghumman Death : बॉडीबिल्डर आणि अभिनेता वरिंदर सिंह घुम्मणचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. छोट्या ऑपरेशनदरम्यान घडली दुर्दैवी घटना घडली. त्याच्याबरोबर नेमकं काय घडलं?
advertisement
1/8

हार्ट अटॅक</a> आला आणि त्याचं निधन झालं. त्याचा मृत्यू अनेकांसाठी चटका लावणारा होता. वयाच्या 53 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. एका किरकोळ ऑपरेशन दरम्यान धुम्मणचा अशाप्रकारे मृत्यू होणं हे अनेकांसाठी संशायास्पद होतं. " width="900" height="900" /> बॉडीबिल्डर आणि अभिनेता वरिंदर सिंह घुम्मन याला हार्ट अटॅक आला आणि त्याचं निधन झालं. त्याचा मृत्यू अनेकांसाठी चटका लावणारा होता. वयाच्या 53 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. एका किरकोळ ऑपरेशन दरम्यान धुम्मणचा अशाप्रकारे मृत्यू होणं हे अनेकांसाठी संशायास्पद होतं.
advertisement
2/8
अमृतसरच्या फोर्टिस रुग्णालयात बायसेप्सच्या किरकोळ शस्त्रक्रियेदरम्यान ही घुम्मणचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणात घुम्मणच्या मित्राने रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप केले आहेत. हॉस्पिटलमध्ये घुम्मणबरोबर नेमकं काय घडलं हे त्याने सांगितलं.
advertisement
3/8
घुम्मणच्या मित्राच्या माहितीनुसार, शस्त्रक्रियेनंतर घुम्मणचा मृतदेह काळानिळा पडला होता. या घटनेनंतर मित्र आणि डॉक्टरांमध्ये वाद झाला डॉ. अनिकेत यांनी सांगितले की, शस्त्रक्रियेदरम्यान आणि नंतर दिलेल्या सर्व औषधांची नोंद फाईलमध्ये आहे आणि सर्व प्रक्रिया नियमांनुसारच करण्यात आल्या होत्या.
advertisement
4/8
घुम्मणच्या बायसेप्समध्ये दुखत असल्यामुळे मायनर ऑपरेशनसाठी अमृतसरच्या फोर्टिस रुग्णालयात गेले होते. शस्त्रक्रिया अगदी छोटी असल्याने त्याच दिवशी डिस्चार्ज मिळणार होता. पण ऑपरेशन सुरू असतानाच त्याला हार्ट अटॅक आला आणि क्षणात त्याच जीव गेला.
advertisement
5/8
घुम्मणच्या मित्रांनी रुग्णालयाकडून ऑपरेशन थिएटरमधील CCTV फुटेजची मागणी केली आहे. मात्र प्रशासनाने सांगितले की थिएटरमध्ये कॅमेरे नाहीत, फक्त बाहेरील भागाचेच फुटेज आहे. त्यानंतर मित्रांना उपलब्ध फुटेज दाखवण्यात आले. सध्या या प्रकरणी कुटुंबीय किंवा पोलिसांकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
advertisement
6/8
वरिंदर घुम्मन यांच्या पुतण्याने सांगितले की, "त्यांचा हात फुगला होता आणि धडधडत होता. त्यामुळे तो स्नायूंच्या शस्त्रक्रियेसाठी फोर्टिस रुग्णालयात गेला. पण अचानक त्यांना झटका आला आणि सर्व काही संपलं."
advertisement
7/8
वरिंदर सिंह घुम्मण हा भारताचा पहिला Vegetarian Professional Bodybuilder म्हणून ओळखला जात होता. त्याने 2009 मध्ये Mr. India किताब जिंकला आणि Mr. Asia मध्ये दुसरे स्थान मिळवलं होते.
advertisement
8/8
कबड्डी वन्स मोअर, टायगर, मरजावा सारख्या सिनेमात त्याने काम केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Varinder Ghumman Death : हृदयसारखा धडधडत होता हात, काळनिळं पडलं शरीर; वरिंदर घुम्मनला नेमकं काय झालं होतं? मित्राने सांगितलं