'आयुष्य संपलं, मी लंगडा होणार...', भर रस्त्यात प्रचंड घाबरला होता राणा दा, सांगितला तो धक्कादायक प्रसंग
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Hardeek Joshi : मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता हार्दिक जोशी याचा काही वर्षांपूर्वी गंभीर अपघात झाला होता. त्यावेळी भर रस्त्यात आता आपलं आयुष्य संपलं असं वाटून अभिनेता प्रचंड घाबरला होता.
advertisement
1/7

1. मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता हार्दिक जोशीचा काही वर्षांपूर्वी एक गंभीर अपघात झाला होता. नुकतच 'कविरत स्टुडिओ'ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने अपघाताचा प्रसंग शेअर केला आहे.
advertisement
2/7
हार्दिक जोशी म्हणाला,"स्वामींची सेवा आमच्याघरी खूप आधीपासून होते. माझा त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. मी कॉलेजमध्ये असताना माझा अपघात झाला होता. क्लासला जाताना मी बाईकवरुन पडलो. त्यावेळी मागून बस येत होती. बसचा टायर माझ्या पायावरुन गेला. पण तरीही हाडाला काहीच झालं नाही.
advertisement
3/7
हार्दिक पुढे म्हणाला,"त्यावेळी मी चालत येऊन फुटपाथवर बसलो. मी स्वामींचं नाव घेतलं हे खरोखर अलौकिक होतं. तेव्हा खूप मोठ-मोठे डॉक्टर बघायला आले होते".
advertisement
4/7
टायर पायावरुन गेलं त्याक्षणी हार्दिक जोशीला खूप प्रश्न पडले होते. आता आयुष्य संपलं, मी लंगडा होणार, मला चालता येणार नाही, असे असंख्य प्रश्न त्याला पडलेले.
advertisement
5/7
हार्दिक जोशीचा हा अपघात 2005 मध्ये झाला होता. त्यावेळी स्वामींनी सुखरूप त्याला यातून बाहेर काढलं.
advertisement
6/7
अपघातादरम्यान हार्दिक जोशीची फक्त स्किन गेली होती जी तीन वर्षांनी आली.
advertisement
7/7
हार्दिक जोशी मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'आयुष्य संपलं, मी लंगडा होणार...', भर रस्त्यात प्रचंड घाबरला होता राणा दा, सांगितला तो धक्कादायक प्रसंग