Gautami Patil : लोखंडी सेफ्टीडोर, साध्या टाइल्स; लाखोंची कमाई करणाऱ्या गौतमी पाटीलचं घर पाहिलं का? फोटो पाहून व्हाल शॉक
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Gautami Patil Diwali celebration : गौतमी पाटीलने इन्स्टाग्रामवर तिच्या दिवाळी सेलिब्रेशनचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत तिने चाहत्यांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
advertisement
1/8

मुंबई: आपल्या ठसकेबाज लावणी आणि वेस्टर्न-फ्यूजन डान्सने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी, 'सबसे कातील' अशी ख्याती मिळवलेली नृत्यांगणा गौतमी पाटीलने यंदाची दिवाळी अगदी साध्या आणि घरगुती पद्धतीने साजरी केली.
advertisement
2/8
गौतमीचे शिक्षण, तिची लाखो रुपयांची कमाई आणि तिचे खासगी आयुष्य जाणून घेण्यास उत्सुक असलेल्या चाहत्यांसाठी दिवाळीनिमित्त तिने शेअर केलेले फोटो खास पर्वणी ठरले आहेत.
advertisement
3/8
गौतमी पाटीलने इन्स्टाग्रामवर तिच्या दिवाळी सेलिब्रेशनचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत तिने चाहत्यांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
advertisement
4/8
दिवाळीच्या निमित्ताने गौतमीने अत्यंत साधा पण आकर्षक फिकट गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता, ज्यात ती खूपच गोड दिसत होती. साधे सौंदर्य आणि नैसर्गिक हास्य यामुळे तिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
advertisement
5/8
या फोटोंची सर्वात खास गोष्ट म्हणजे, चाहत्यांना गौतमीच्या घराची झलक पाहायला मिळाली आहे. गौतमीने आपले घर अत्यंत साधे आणि नीटनेटके ठेवले आहे. घराच्या दारात तिने कमळाच्या डिझाईनची सुंदर रांगोळी काढली होती, जी तिच्या कलात्मकतेला दाद देणारी आहे.
advertisement
6/8
हातात दिवे घेऊन गौतमीने घराच्या गॅलरीमध्ये खास पोज दिल्या आहेत. तिच्या फोटोंमध्ये घरामागील साधे बांधकाम दिसत असले तरी, गौतमीने लावलेले दिवे आणि सजावट तिच्या मनातील आनंद दर्शवत आहे.
advertisement
7/8
रिपोर्ट्सनुसार, १९९६ साली एका गरीब कुटुंबात जन्मलेली गौतमी पाटील अथक परिश्रमाने आज या उंचीवर पोहोचली आहे. तिने लहानपणापासूनच वेस्टर्न डान्सचे प्रशिक्षण घेतले आहे आणि लावणी व वेस्टर्नचा अनोखा मेळ घालून तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
advertisement
8/8
महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आणि गावांमध्ये गौतमीच्या नृत्याचे कार्यक्रम होतात आणि या कार्यक्रमांना आजही चाहते मोठी गर्दी करतात. नृत्याच्या माध्यमातून आज ती लाखो रुपये कमवते. तिची ही साधी दिवाळी तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Gautami Patil : लोखंडी सेफ्टीडोर, साध्या टाइल्स; लाखोंची कमाई करणाऱ्या गौतमी पाटीलचं घर पाहिलं का? फोटो पाहून व्हाल शॉक