सुपरस्टारच्या प्रेमात आकंठ बुडाली, इंडस्ट्रीला रामराम ठोकून थाटला संसार, फिल्मपेक्षा कमी नाही अभिनेत्रीची लव्हस्टोरी
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Namrata Shirodkar Birthday: अनेक कलाकारांनी प्रेमात सगळी बंधने झुकारून लग्नगाठ बांधली. अशाच एका अभिनेत्रीविषयी जाणून घेऊया जी सुपस्टारच्या प्रेमात आकंठ बुडाली होती.
advertisement
1/8

प्रेमात लोक काहीही करताना दिसतात. यामध्ये सेलिब्रिटीही मागे नाहीत. अनेक कलाकारांनी प्रेमात सगळी बंधने झुकारून लग्नगाठ बांधली. अशाच एका अभिनेत्रीविषयी जाणून घेऊया जी सुपस्टारच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. त्याच्यासाठी तिने इंडस्ट्रीलाही रामराम ठोकला.
advertisement
2/8
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून नम्रता शिरोडकर आहे. 22 जानेवारीला नम्रताच वाढदिवस असतो. तिच्या बर्थ डे स्पेशल आपण तिची हटके लव्हस्टोरी जाणून घेऊया.
advertisement
3/8
नम्रताने मिस इंडिया युनिव्हर्सचा किताब पटकावला होता. 1998 मध्ये सलमान खान आणि ट्विंकल खन्नासोबत तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
advertisement
4/8
नम्रता शिरोडकर ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. मात्र, लग्नानंतर तिने अभिनय सोडला. महेश बाबूसोबत लग्न करण्यासाठी तिने करिअरही सोडलं.
advertisement
5/8
महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांची पहिली भेट 2000 मध्ये तेलुगू चित्रपट 'वामसी'च्या शूटिंगदरम्यान झाली. नम्रता आणि महेश बाबूचा तेलुगूमधील पहिलाच सिनेमा होता.
advertisement
6/8
नम्रता महेश बाबूपेक्षा 4 वर्षांनी मोठी आहे. पण यामुळे त्यांच्या नात्यात कधीच अडचण आली नाही. नम्रता आणि महेशने त्यांचे नाते गुप्त ठेवले होते.
advertisement
7/8
पहिल्या सिनेमाच्या सेटवर मैत्री झाली. नंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी 10 फेब्रुवारी 2005 रोजी विवाह केला. हा विवाह एक साधा आणि पारंपरिक सोहळा होता, ज्यामध्ये फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते.
advertisement
8/8
महेशला त्याच्या पत्नीने अभिनय करावा असे वाटत नव्हते आणि त्यामुळेच नम्रता अभिनयापासून दूर राहिली. नम्रताने मुले आणि कुटुंबावर लक्ष केंद्रित केले. हे जोडपे दोन मुलांचे पालक आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सुपरस्टारच्या प्रेमात आकंठ बुडाली, इंडस्ट्रीला रामराम ठोकून थाटला संसार, फिल्मपेक्षा कमी नाही अभिनेत्रीची लव्हस्टोरी