TRENDING:

OTT Releases This Week : 2025 चा शेवटचा आठवडा, ओटीटीवर रिलीज झाल्यात या 9 नव्या फिल्म आणि सीरिज

Last Updated:
OTT Releases This Week : 22 ते 28 डिसेंबरदरम्यान ओटीटीवर अनेक फिल्म आणि सीरिज रिलीज होत आहेत. त्यामुळे या आठवड्यातील लाँग वीकेंडला प्रेक्षकांना घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.
advertisement
1/9
OTT वर रिलीज झाल्यात या 9 नव्या फिल्म आणि सीरिज
मिडिल क्लास (Middle Class) : तुम्हाला या लाँग वीकेंडला कॉमेडी फिल्म पाहायची असेल तर या आठवड्यात 'मिडिल क्लास' ही फिल्म नक्की पाहा. या कॉमेडी फिल्ममध्ये फॅमिली ड्रामा दाखवण्यात आला आहे. 'मिडिल क्लास' ही तमिळ फिल्म 25 डिसेंबर 2025 रोजी ओटीटीवर रिलीज होत आहे.
advertisement
2/9
रोंकिनी भवन (Ronkini Bhavan) : 'रोंकिनी भवन' ही एक सायकोलॉजिकल थ्रिलर सीरिज आहे. नुकतंच लग्न झालेल्या जूथिका (श्यामोप्ति मुडली) आणि आदित्यनाथ (गौरव रॉय चौधरी) यांच्या आयुष्यावर आधारित या फिल्मची कथा आहे. नववधूला गायब करणं किंवा तिच्या निधनावर शोक व्यक्त करण्याची आदित्यनाथच्या घरची परंपरा असते. या पौराणिक कथा आणि परंपरांचा जूथिका मात्र शोध लावते. दरम्यान या सर्व रहस्य आणि परंपरा या गोष्टींचा जूथिकाला भीती वाटते. अंगावर शहारे आणणारी ही सीरिज प्रेक्षकांना 25 डिसेंबरपासून Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.
advertisement
3/9
एक दीवाने की दीवानियत (Ek Deewane Ki Deewaniyat) : हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा अभिनीत 'एक दीवाने की दीवानियत' ही फिल्म ऑक्टोबर 2025 मध्ये थिएटरमध्ये रिलीज झाली होती. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगली कमाई केली. आता ही फिल्म ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे. 26 डिसेंबरला ही फिल्म Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे.
advertisement
4/9
रिवॉल्वर रीटा (Revolver Rita) : कीर्ति सुरेशच्या 'रिवॉल्वर रीटा' या फिल्ममध्ये प्रेक्षकांना डार्क कॉमेडी पाहायला मिळेल. थिएटर गाजवल्यानंतर आता ही फिल्म ओटीटीवर रिलीज झाली आहे. 'रिवॉल्वर रीटा' ही फिल्म प्रेक्षकांना 26 डिसेंबरपासून Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.
advertisement
5/9
कवर अप (Cover Up) : 'कवर अप' ही हॉलिवूड फिल्म या आठवड्यात येत्या 26 डिसेंबरला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. हॉलिवूडप्रेमींनींसाठी या वीकेंडला पाहण्यासाठी 'कवर अप' ही फिल्म परफेक्ट आहे.
advertisement
6/9
सिंगल सलमा (Single Salma) : 'महारानी 4'नंतर हुमा कुरैशी पुन्हा एकदा 'सिंगल सलमा'च्या माध्यमातून ओटीटी गाजवायला सज्ज आहे. 26 डिसेंबर 2025 रोजी ही कॉमेडी फिल्म नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. एका आत्मनिर्भर महिलेची गोष्ट या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे.
advertisement
7/9
बाहुबली द एपिक (Baahubali The Epic) : एसएएस राजामौली यांचा बहुचर्चित 'बाहुबली द एकिक' हा सिनेमा अखेर JioHotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. ही चार तासांची फिल्म या नाताळच्या वीकेंडला नक्की पाहा.
advertisement
8/9
स्ट्रेंजर थिंग्स सीजन 5 वॉल्यूम 2 (Stranger Things Season 5 Vol 2) : नेटफ्लिक्सची बहुप्रतीक्षित 'स्ट्रेंजर थिंग्स सीझन 5 वॉल्यूम 2' अखेर ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे. या सीरिजचे हे नवे एपिसोड प्रेक्षकांना 25 डिसेंबरपासून पाहायला मिळतील.
advertisement
9/9
निधियुम भूतवुम (Nidhiyum Bhoothavum) : 'निधियुम भूतवुम' ही एक मल्याळम कॉमेडी फिल्म आहे. तीन तरुणांभोवती फिरणारं या फिल्मचं कथानक आहे. 25 डिसेंबरपासून प्रेक्षकांना ही फिल्म Sun NXT या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OTT Releases This Week : 2025 चा शेवटचा आठवडा, ओटीटीवर रिलीज झाल्यात या 9 नव्या फिल्म आणि सीरिज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल