Onkar Bhojane : ओंकार भोजनेची घरवापसी! 'कोकण कोहिनूर' पुन्हा हास्यजत्रेत, शूटींगला सुरुवात
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Onkar Bhojane Maharashtrachi Hasyajatra Comeback : अभिनेता ओंकार भोजने पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. ओंकारची हास्यजत्रेत घरवापसी झाली आहे.
advertisement
1/9

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कॉमेडी शोमधील अनेक व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यातील एक व्यक्तिरेखा म्हणजे ओंकार भोजने.
advertisement
2/9
'अगं अगं आई...' असो किंवा 'साइन कॉस थिटा' ओंकार अशा अनेक स्किट्समधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. कोकण कोहिनूर ही ओळख त्याला हास्यजत्रेमुळे मिळाली.
advertisement
3/9
मधल्या काळात ओंकारने मध्येच हास्यजत्रा सोडली आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. प्रेक्षकांना नाराज करणारा ओंकार भोजने पुन्हा एकदा महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये दिसणार आहे.
advertisement
4/9
ओंकार भोजनेची महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये घरवापसी झाली झाली. ओंकारने शूटींगलाही सुरुवात केली आहे. ओंकार भोजने पुन्हा एकदा हास्यजत्रेचा मंच गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.
advertisement
5/9
मधल्या काळात ओंकार भोजनेनं महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडली. त्यानंतर तो सिनेमात दिसला. दरम्यान त्याने झी मराठीवरील फू बाई फूच्या नव्या सीझनमध्ये एन्ट्री घेतली होती. पण तो शो काही महिन्यातच बंद पडला.
advertisement
6/9
त्यानंतर ओंकार भोजनेनं थेट कलर्स मराठीवरील हसताय ना हसायलाच पाहिजे या कॉमेडी शोमध्ये एन्ट्री घेतली. पण दुर्दैवानं हा शो देखील काही महिन्यात बंद झाला.
advertisement
7/9
आता काही काळ विश्रांती घेतल्यानंतर ओंकार पुन्हा हास्यजत्रेत परत येतोय. ओंकारला पुन्हा हास्यजत्रेत पाहायचं आहे अशी मागणी अनेक महिने चाहते सोशल मीडियावर करत होते. अखेर प्रेक्षकांची ती प्रतीक्षा संपणार आहे.
advertisement
8/9
ओंकारने नुकतीच शोच्या शूटींगला सुरुवात केली असून तो लवकरच नव्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या दिवाळीत हास्याचा डबल डोस मिळणार आहे.
advertisement
9/9
यंदाच्या दिवाळीत टेलिव्हिजनवर विनोदाचे फटाके फुटणार आहेत. 'कोकण कोहिनूर' ओंकार भोजनेच्या घरवापसीमुळे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची रंगत आणखी खुलणार आहे यात शंका नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Onkar Bhojane : ओंकार भोजनेची घरवापसी! 'कोकण कोहिनूर' पुन्हा हास्यजत्रेत, शूटींगला सुरुवात