TRENDING:

OTT Movie: दृश्यमपेक्षा जबरदस्त सस्पेन्स; सीरियल किलरचा खेळ, 'हा' क्राइम थ्रिलर पाहून डोकं चक्रावेल

Last Updated:
OTT Movie: ओटीटीवर एकापेक्षा एक सस्पेन्स, थ्रिलरने भरलेले सिनेमे सीरीज आहेत. प्रेक्षकही अशा कंटेटची वाट पाहत असतात. त्यामुळे आजकाल तर असे सिनेमे-सीरीज लगेच ट्रेंडमध्ये येतात.
advertisement
1/7
दृश्यमपेक्षा जबरदस्त सस्पेन्स; सीरियल किलरचा खेळ, डोकं चक्रावणारा क्राइम थ्रिलर
ओटीटीवर एकापेक्षा एक सस्पेन्स, थ्रिलरने भरलेले सिनेमे सीरीज आहेत. प्रेक्षकही अशा कंटेटची वाट पाहत असतात. त्यामुळे आजकाल तर असे सिनेमे-सीरीज लगेच ट्रेंडमध्ये येतात. अशाच एका सिनेमाविषयी जाणून घेऊया जो सस्पेन्स आणि थ्रिलने भरलेला आहे.
advertisement
2/7
थिएटरमध्ये धडाकेबाज कमाई आणि समीक्षकांकडून प्रशंसा मिळवल्यानंतर आता हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर दाखल झाला आहे. आपण बोलत असलेल्या या क्राइम सस्पेन्स थ्रिल सिनेमाचं नाव आहे, 'मार्गन'.
advertisement
3/7
25 जुलैपासून तो स्ट्रीम होत आहे आणि खास गोष्ट म्हणजे तो हिंदी डबमध्ये देखील उपलब्ध आहे. ‘मार्गन’ हा प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा सिनेमा आहे.
advertisement
4/7
चित्रपटात एक सीरियल किलर आहे, जो पुरुषांसोबत महिलांनाही बळी बनवतो. पण त्याची हत्या करण्याची पद्धत धक्कादायक आहे. तो एक गूढ रसायन वापरतो ज्यामुळे महिलांचे शरीर काळे पडते. पोलिस कितीही प्रयत्न करतात तरी तो खुनी सापडत नाही.
advertisement
5/7
या गुन्ह्याच्या तपासासाठी नवीन एडीजीपी श्री. ध्रुव (विजय अँटनी) यांची एंट्री होते. तो प्रत्येक खुनामागचा धागा जोडत जातो. कथानक जसजसे पुढे सरकते तसतसे खरा खुनी उघड होतो जो फक्त खुनी नाही, तर एक धोकादायक आणि निर्दयी व्यक्ती आहे.
advertisement
6/7
‘मार्गन’मध्ये इतका तगडा सस्पेन्स आहे की प्रेक्षक शेवटपर्यंत स्क्रीनला खिळून राहतात. विशेषतः क्लायमॅक्स पाहून प्रेक्षकांना पुन्हा कथा डोक्यात फिरते आणि प्रत्येक सीन नव्याने आठवतो.
advertisement
7/7
मुख्य भूमिकेत विजय अँटनी चमकतो. त्याच्यासोबत अजय दिशान, कुमार नटराजन, समुथिरकणी, रामचंद्रन दुरियाराज, महानदी शंकर आणि विनोद सागर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे लिओ जॉन पॉल यांनी, जे तमिळ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध संपादक आहेत. पहिल्याच दिग्दर्शनात त्यांनी प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यश मिळवले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OTT Movie: दृश्यमपेक्षा जबरदस्त सस्पेन्स; सीरियल किलरचा खेळ, 'हा' क्राइम थ्रिलर पाहून डोकं चक्रावेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल