TRENDING:

OTT : खतरनाक सस्पेन्स, वेड लावणारा क्लायमॅक्स, 'या' फिल्मसमोर 'दृश्यम'ही फिका

Last Updated:
OTT : ओटीटीवरील एका चित्रपटात खतरनाक सस्पेन्स आणि क्यायमॅक्स आहे. IMDB वर या चित्रपटाला 7.3 रेटिंग मिळाली आहे.
advertisement
1/7
OTT : खतरनाक सस्पेन्स, वेड लावणारा क्लायमॅक्स, 'या' फिल्मसमोर 'दृश्यम' फिका
सस्पेन्स जॉनरचे चित्रपट आणि वेबसीरिज पाहणाऱ्यांच्या संख्येत सध्या वाढ होत आहे. कोरोनादरम्यान ओटीटीची क्रेझ चांगलीच वाढली जी आजही कायम आहे. घरबसल्या प्रेक्षकांना आपल्या आवडीचे चित्रपट आणि सीरिज पाहता येत आहेत. पण ओटीटीवरील एक जबरदस्त सस्पेन्स आणि थक्क करणारा क्लायमॅक्स असणारी एक फिल्म तुमच्या वॉच लिस्टमध्ये असायलाच हवी.
advertisement
2/7
ओटीटीवरील हा सस्पेंस आणि क्लायमॅक्स पाहून तुमचं डोक सुन्न होईल. महत्त्वाचे म्हणजे अजय देवगणच्या 'दृश्यम'पेक्षाही खतरनाक या चित्रपटाचा सस्पेन्स आहे. यावरुनच चित्रपट किती दमदार आहे याचा तुम्हाला अंदाज येईल.
advertisement
3/7
अजय देवगणचा 'दृश्यम' हा चित्रपट 2015 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर जवळपास एका वर्षाने हा सायको थ्रिलर चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात आजचे दोन सुपरस्टार आणि आघाडीची अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत होती. या चित्रपटातील ट्विस्ट आणि टर्न्स तुम्हाला गुंतवून ठेवतील.
advertisement
4/7
'रमन राघव 2.0' असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा विकी कौशल सुपरस्टार झालेला नव्हता. 'मसान'नंतर विकीचं नाव इंडस्ट्रीतील चर्चित कलाकारांमध्ये घ्यायला सुरुवात झाली.
advertisement
5/7
'रमन राघव 2.0' या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सीरियल किलर रमनच्या भूमिकेत होते. रात्रीच्या वेळी मुलींना पळून आणून त्यांच्यावर वार करणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेला नवाजुद्दीने न्याय दिला होता.
advertisement
6/7
विकी कौशल 'रमन राघव 2.0' या चित्रपटात पोलीस इंस्पेक्टरच्या भूमिकेत होता. त्याने एसीपी राघवनची भूमिका साकारली होती. आपल्या दमदार अभिनयाने त्याने या चित्रपटात सर्वांना थक्क केलं होतं.
advertisement
7/7
'रमन राघव 2.0' या चित्रपटाला IMDB वर 7.3 रेटिंग मिळाले आहे. हा चित्रपट Zee5 आणि नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला पाहता येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OTT : खतरनाक सस्पेन्स, वेड लावणारा क्लायमॅक्स, 'या' फिल्मसमोर 'दृश्यम'ही फिका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल