42 गाण्यांची फिल्म, जिने कोठ्यावर जन्मलेल्या मुलीला बनवलं सुपरस्टार, क्रेझ इतकी की टांगेवाल्याने गहाण ठेवले घोडे
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
First Superstar of India : देशातील पहिल्या महिला सुपरस्टारसाठी तिच्या चाहत्यांमध्ये तुफान क्रेझ होती. इतकी की तिने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी यशाचे शिखर गाठले.
advertisement
1/8

मुंबई: एखाद्या व्यक्तीसाठी असलेली वेडी आवड आणि तिच्यासाठी काहीही करण्याची तयारी... हाच वेडेपणा बॉलिवूडच्या पहिल्या महिला सुपरस्टारसाठी तिच्या चाहत्यांमध्ये होता. ही कहाणी आहे त्या अभिनेत्रीची, जिने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी यशाचे शिखर गाठले.
advertisement
2/8
तिएका चित्रपटासाठी लाहोरच्या एका टांगेवाल्याने तब्बल २२ वेळा तिकीट काढले, इतकेच नाही तर यासाठी त्याने त्याचे घोडेही गहाण ठेवले. ही अविश्वसनीय कथा आहे, कोठ्याच्या गल्लीतून थेट शाही महालापर्यंत पोहोचलेल्या कज्जनबाई यांची.
advertisement
3/8
१५ फेब्रुवारी १९१५ रोजी कज्जनबाईंचा जन्म लखनऊच्या सुग्गनबाई या प्रसिद्ध तवायफच्या घरी झाला. त्यांचे खरे नाव जहांआरा कज्जन असे होते. त्यांची आई सुग्गनबाई स्वतः गाण्यांसाठी प्रसिद्ध होत्या आणि त्यांच्या महफिलीत नवाब, श्रीमंत लोक येत असत. कज्जनबाईंना हा गायनाचा वारसा आईकडून मिळाला.
advertisement
4/8
सुग्गनबाई यांनी मुलीला खास प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. कज्जनबाईंना इंग्रजी, उर्दू आणि शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेण्यासाठी पाटण्याला पाठवले होते. यामुळे त्यांची हिंदी-उर्दूसह इंग्रजीवरही चांगली पकड होती.
advertisement
5/8
कज्जनबाईंच्या गाण्याच्या कौशल्यामुळे त्यांची ओळख वाढू लागली. त्यांच्या एका परफॉर्मन्ससाठी त्या काळात त्यांना २५० ते ३०० रुपये मिळत असत. त्यांच्या याच टॅलेंटमुळे निर्माते जमशेद मदन यांनी त्यांना आपल्या आगामी चित्रपटासाठी कास्ट केले. हा चित्रपट होता, भारतातील दुसरा बोलपट 'शिरीन फरहाद'.
advertisement
6/8
पहिला बोलपट 'आलम आरा' रिलीज झाल्यानंतर काही आठवड्यातच 'शिरीन फरहाद' प्रदर्शित झाला. या चित्रपटात कज्जनबाई आणि निसार यांनी मिळून तब्बल ४२ गाणी गायली होती. एकाच चित्रपटात एवढी गाणी असण्याचा हा एक ऐतिहासिक विक्रम होता.
advertisement
7/8
चित्रपट सुपरहिट झाला आणि वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी कज्जनबाई हिंदी सिनेमाच्या पहिल्या महिला सुपरस्टार बनल्या. त्यांच्यासाठी लोकांमध्ये प्रचंड वेड होते.
advertisement
8/8
लाहोरच्या एका तांगेवाल्याने 'शिरीन फरहाद' चित्रपट २२ वेळा पाहिला. तिकिटांसाठी पैसे कमी पडल्याने त्याने आपले घोडेपर्यंत गहाण ठेवले होते, असे सांगितले जाते. कज्जनबाईंनी कोठ्यातून बाहेर पडून आपल्या टॅलेंटच्या बळावर राजघराण्यातील राजकुमारीसारखे आलिशान आयुष्य जगले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
42 गाण्यांची फिल्म, जिने कोठ्यावर जन्मलेल्या मुलीला बनवलं सुपरस्टार, क्रेझ इतकी की टांगेवाल्याने गहाण ठेवले घोडे