OTT Release : घरबसल्या मनोरंजनाचा फुल ऑन डोस! रिलीज होतायत 'या' मोस्ट अवटेड फिल्म्स आणि सीरिज
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
OTT Release This Week : 13 ते 19 ऑक्टोबरदरम्यान ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक वेब सीरिज आणि चित्रपट होणार रिलीज होणार आहेत. त्यामुळे दिवाळीआधीच प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. नेटफ्लिक्स, झी 5, सोनी लिव्ह, प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात काय पाहता येणार जाणून घ्या...
advertisement
1/7

भागवत चॅप्टर 1 : राक्षस : अरशद वारसी आणि जितेंद्र कुमारचा 'भागवत चॅप्टर 1: राक्षस' या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 17 ऑक्टोबरला झी 5 या प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज होईल.
advertisement
2/7
मॅडम सेनगुप्ता : राहुल बोस आणि रितुपर्णा सेनगुप्ता यांचा 'मॅडम सेनगुप्ता' हा चित्रपट जुलैमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आता 17 ऑक्टोबरला झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज होईल.
advertisement
3/7
अभ्यंतरा कुट्टावली : 'अभ्यंतरा कुट्टावली' हा दाक्षिणात्य चित्रपट ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे. जूनमध्ये हा चित्रपट 17 ऑक्टोबरला झी 5 वर स्ट्रीम होणार आहे.
advertisement
4/7
द डिल्पोमॅट सीझन 3 : ओटीटी प्लॅटफॉर्मवर हॉलिवूडचाही धमाका होणार आहे. 'द डिप्लोमॅट सीझन 3' येत्या 16 ऑक्टोबरपासून प्रेक्षक पाहू शकतात.
advertisement
5/7
द परफेक्ट नेबर : 'द परफेक्ट नेबर'ची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. 17 ऑक्टोबर 2025 रोजी हा माहितीपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
advertisement
6/7
द ट्विस्ट : एनिमेटेड चित्रपटांची आवड असेल तर 'द ट्विस्ट' हा चित्रपट तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. 17 ऑक्टोबरला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज होणार आहे.
advertisement
7/7
इंडियन आयडल 16 : 'इंडियन आयडल 16' हा लोकप्रिय सिंगिंग शो यंदा टीव्हीवर प्रसारित न होता सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक पाहू शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OTT Release : घरबसल्या मनोरंजनाचा फुल ऑन डोस! रिलीज होतायत 'या' मोस्ट अवटेड फिल्म्स आणि सीरिज