जिथे करायचे काम तिथेच केली 'हेरा फेरी', थेट बॉसच्या मुलीलाच पटवलं, परेश रावल यांची Filmy Love Story
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Paresh Rawal Love Story : अभिनेते परेश रावल यांची लव्ह स्टोरी एखाद्या फिल्मपेक्षा कमी नाहीये. ज्या ठिकाणी ते काम करत होते त्या बॉसच्या मुलीलाच त्यांनी आपली बायको बनवलं.
advertisement
1/9

बॉलिवूड कलाकारांच्या लव्ह स्टोरी सांगू तितक्या कमी आहेत. प्रेमासाठी माणूस काहीही करायला तयार असतो. अनेक कलाकारांना एका सिनेमात काम करताना त्यांचं पहिलं प्रेम भेटलं.
advertisement
2/9
पण बॉलिवूडचा असा एक अभिनेता ज्याला त्याचं प्रेम सिनेमाच्या सेटवर किंवा इंडस्ट्रीत नाही तर काम करत असलेल्या कंपनीत भेटलं. त्याने थेट त्याच्या बॉसच्या मुलीलाच पटवलं.
advertisement
3/9
विनोदी भूमिकांपासून ते खलनायकी भूमिकांमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारे अभिनेते परेश रावल यांच्याबद्दल आपण बोलत आहोत. परेश रावल यांची लव्ह स्टोरी चांगलीच फिल्मी आहे.
advertisement
4/9
ज्या कंपनीत ते काम करत होते त्याच कंपनीच्या बॉसला त्यांनी पटवलं. तिच्याशी लग्न केलं आणि आज अनेक वर्षांचा त्यांचा सुखाचा संसार सुरू आहे.
advertisement
5/9
एका मुलाखतीत परेश रावल यांनी त्यांची भन्नाट लव्ह स्टोरी सांगितली होती. स्वरुपा असं त्यांच्या बायकोचं नाव आहे. त्यांनी स्वरुपाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मित्राला सांगितलं होतं की, मी हिच्याशीच लग्न करणार.
advertisement
6/9
तेव्हा त्यांचा मित्र महेंद्र यांने त्यांना सांगितलं की, स्वरुपा ही त्यांच्या कंपनीच्या बॉसची मुलगी आहे. तेव्हा परेश म्हणाले, "मी तिच्याशी लग्न करेन, मग ती कोणाचीही मुलगी, बहीण किंवा आई असो." परेश रावल यांचे हे शब्द अखेर खरे ठरले.
advertisement
7/9
स्वरूपला पाहिल्यानंतर पहिल्या काम काही महिन्यांतच परेश रावल त्यांनी प्रपोज केलं होतं. त्यांनी तिला सांगितलं होतं की, "मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. आपण एकमेकांना ओळखून घेऊया असं म्हणू नकोस, कारण आयुष्यभरातही कोणी कोणाला पूर्ण ओळखू शकत नाही."
advertisement
8/9
परेश रावल आणि स्वरुपा यांनी 1987 मध्ये लग्न केलं. दोघांचा सुखी संसार आजही सुरू आहे. दोघांना आदित्य आणि अनिरुद्ध अशी दोन मुलं आहेत.
advertisement
9/9
स्वरूप संपत यांनी 1979 मध्ये Miss India चा किताब जिंकला होता. त्या अभिनेत्री असून त्यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. त्यांनी 'ये जो हे जिंदगी' या लोकप्रिय कॉमेडी मालिकेत तसेच हिंमतवाला आणि साथिया सारख्या सिनेमात काम केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
जिथे करायचे काम तिथेच केली 'हेरा फेरी', थेट बॉसच्या मुलीलाच पटवलं, परेश रावल यांची Filmy Love Story