TRENDING:

Prajakta Mali : 'विनंती आहे हे थांबवा...' स्वत:चाच फोटो पाहून भडकली प्राजक्ता माळी, नेमकं झालं काय?

Last Updated:
Prajakta Mali Photo : अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते. पण तिच्या फॅन्सने पोस्ट केलेला तिचा एक फोटो पाहून ती चांगलीच भडकली. असं काय होतं त्या फोटोमध्ये?
advertisement
1/9
'विनंती आहे हे थांबवा' स्वत:चाच फोटो पाहून भडकली प्राजक्ता माळी, नेमकं झालं काय?
अभिनेत्री प्राजक्ता माळी गेली अनेक वर्ष टेलिव्हिजन माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'जुळून येती माझी रेशीमगाठी' या मालिकेतून प्राजक्ता माळीनं मालिकेत पदार्पण केलं. त्यानंतर 'नकटीच्या लग्नाला यायचं हा' मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली.
advertisement
2/9
'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेनं प्राजक्ताला ओळख मिळवून दिली. तिने साकारलेली मेघना आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मालिकेनंतर प्राजक्तानं निवेदन आणि स्वत:च्या बिझनेसकडे आपला मोर्चा वळवला.
advertisement
3/9
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून प्राजक्ता माळी प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. हास्यजत्रामध्ये प्राजक्ताचं निवेदन हे नेहमीच खास ठरतं. गेली अनेक वर्ष प्राजक्ता हास्यजत्रा होस्ट करतेय.
advertisement
4/9
मराठी इंडस्ट्रीमध्ये प्राजक्ताही एकमेव अभिनेत्री आहे ती सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रीय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. प्राजक्ता तिच्या आयुष्यातील अनेक अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असते.
advertisement
5/9
इन्स्टाग्रामवर प्राजक्ताला 2.3 मिलियन लोक फॉलो करतात. प्राजक्ताच्या अधिकृत अकाऊंटबरोबरच तिने अनेक फॅन क्लब देखील आहेत. तिथेही लाखो लोक तिला फॉलो करतात.
advertisement
6/9
प्राजक्ताचं फोटोशूट सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतं. तिच्या ज्वेलरी ब्रँडचं हटके फोटोशूट ती नेहमीच शेअर करत असते. पण प्राजक्तासमोर तिचा असा एक फोटो आला जो पाहून ती चांगलीच भडकली.
advertisement
7/9
प्राजक्ता माळी एक अशी अभिनेत्री आहे जी तिच्या फॅन्सनं व्यक्त केलेल्या प्रेमावर नेहमीच तिची प्रतिक्रिया देत असते. त्यांनी तिच्यासाठी तयार केलेल्या कलाकृती शेअर करत असते. पण एका फॅन पेजने प्राजक्ताचा तयार केलेला AI फोटो पाहून ती चांगलीच भडकली.
advertisement
8/9
प्राजक्ता तिचा AI फोटो शेअर करत फॅन पेजला चांगलंच झापलं आहे. तिने लिहिलंय, "फोटो कितीही सुंदर दिसत असला तरी मी कधीच AI ने तयार केलेल्या फोटो किंवा व्हिडीओंचं कौतुक करणार नाही."
advertisement
9/9
"माझ्या फॅन क्लब्सना आणि सगळ्यांना विनंती आहे की असे फोटो व्हिडीओ तयार करणं थांबवा", अशी विनंतीही प्राजक्तानं केली. प्राजक्तानं घेतलेल्या या निर्णयाचं तिच्या चाहत्यांनीही कौतुक केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prajakta Mali : 'विनंती आहे हे थांबवा...' स्वत:चाच फोटो पाहून भडकली प्राजक्ता माळी, नेमकं झालं काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल