नवस फेडायला आजोळी पोहोचली प्राजक्ता माळी, कुटुंबाच्या 4 पिढ्या आल्या एकत्र, PHOTO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या गावाकडचे फोटो शेअर केले आहेत. तिच्या कुटुंबातील चार पिढ्या एकत्र आल्या आहेत.
advertisement
1/8

अभिनेत्री प्राजक्ता माळी नुकतीच फुलवंती सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तसंच महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधूनही ती प्रेक्षकांना भेटत असते. प्राजक्ता सोशल मीडियावरही चांगलीच सक्रीय असते. ग्लॅमरस फोटोशूटबरोबरच प्राजक्ताने नुकतेच तिच्या गावाकडचे काही फोटो शेअर केलेत.
advertisement
2/8
अलीकडेच तिने तिच्या आजोळी म्हणजे भाळवणी (ता. पंढरपूर) येथे गेली होती. तिथले काही खास फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. या पोस्टमध्ये तिने कावडी संदर्भात एक भावनिक गोष्ट सांगितली आहे. तिचे कुटुंब आणि चार पिढ्या एकत्र आल्याचेही तिने सांगितले.
advertisement
3/8
शिखरशिंगणापूर कावडीमागची हृदयस्पर्शी गोष्ट सांगताना प्राजक्तानं तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "गावची कावड. नायकाची भाळवणी – पंढरपूर -आजोळ, नवसफेड."
advertisement
4/8
"शिंदे - लोखंडे - जीवाभावाचे मित्र. लोखंडेंनी शिखरशिंगणापूरला राजाकडून मान- निशाणी मिळवण्यासाठी दांडपट्ट्यामध्ये जिंकून तो मिळविण्याचा पण केला. ते जिंकले, मान मिळाला पण दांडपट्टा खेळत असता लोखंडेंची प्राणज्योत मालवली, मैत्रीत खंड पडला."
advertisement
5/8
" शेवटच्या घटका मोजत त्यांनी शिंदेकडून वचन घेतलं, “जोवर आकाशात चंद्र- सूर्य आहेत तोवर आपल्या मैत्रीचं प्रतीक म्हणून शिंदे- लोखंडे अशा दोन्ही कावडी एकत्र शिखरशिंगणापूरला जातील. त्यात खंड पडणार नाही. आणि तोवर मानाप्रमाणे दोन्हीं कावडींच्या पताकांची नक्कल कोणीही करू शकणार नाही."
advertisement
6/8
"गेल्या कित्येक पिढ्यांपासून भाळवणीकर दोन मित्रांचं हे वचन प्राणपणानं जपतात. आजही जेव्हा कावडी शिखरशिंगणापूरला जातात भाळवणी निर्मनुष्य होते."
advertisement
7/8
प्राजक्ताने या ट्रिपदरम्यान तुळजापूरच्या कुलदेवतेचं दर्शन घेतलं. तिने आई तुळजाभवानीच्या मंदिरातील फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे.
advertisement
8/8
या पोस्टवर अनेकांनी कमेंट करून प्राजक्ताचं कौतुक केलं. तिच्या घरातील चार पिढ्या एकत्र आल्या ही गोष्ट अनेकांच्या मनाला भावली. परंपरा आणि नात्यांना तिने दिलेलं महत्त्व लोकांच्या लक्षात आलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
नवस फेडायला आजोळी पोहोचली प्राजक्ता माळी, कुटुंबाच्या 4 पिढ्या आल्या एकत्र, PHOTO