Prajakta Mali : प्राजक्ताने केलाय मेकअप, त्यात काय दिसतंय वेगळं? म्हणाली, 'कधी नव्हे ते...'
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Prajakta Mali Photo : अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिचे नवे फोटो शेअर केलेत. हे फोटो बघून तुम्ही त्याकडे पाहतच रहाल.
advertisement
1/8

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या सहज सौंदर्यासाठी ओळखली जाते. ग्लॅमरस असो की पारंपरिक लूक, प्राजक्ता नेहमीच तिच्या चाहत्यांच्या मनात घर करते.
advertisement
2/8
सध्या तिचा एक नवीन फोटोशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावेळी प्राजक्ताने नेहमीपेक्षा काही तरी वेगळं केल्याचं दिसतंय.
advertisement
3/8
नेहमी नॅचरल लूकमध्ये दिसणारी प्राजक्ता यावेळी थोडी वेगळी भासली. तिने डोळ्यांत गडद काजळ लावलं असून त्यामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.
advertisement
4/8
सोशल मीडियावर तिने पोस्ट शेअर करत लिहिलं, "कधी नव्हे ते काजळ लावलं..." आणि तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला.
advertisement
5/8
या लूकमध्ये प्राजक्ताने निळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. ड्रेससोबत तिने सौम्य मेकअप आणि सोज्वळ हावभाव दाखवले आहेत. तिचा हा सालस अंदाज पाहून अनेक चाहते घायाळ झाले आहेत. फोटोमध्ये ती खूपच आकर्षक आणि प्रसन्न दिसतेय.
advertisement
6/8
प्राजक्ताच्या या नव्या अंदाजावर तिच्या फॅन्सनी भरभरून प्रेम दिलं आहे. "खूप सुंदर दिसतेस", "नजरेतच जादू आहे", "हे फोटो बघतच बसलोय" अशा अनेक कमेंट्स तिच्या पोस्टवर पाहायला मिळत आहेत. अनेकांनी तिच्या डोळ्यांमधील काजळचं विशेष कौतुक केलं आहे.
advertisement
7/8
प्राजक्ता माळी केवळ अभिनयासाठीच नाही, तर तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. ती नेहमीच साध्या पण आकर्षक स्टाइलने चाहत्यांचं लक्ष वेधते. या पोस्टमध्ये तिने निळ्या ड्रेससोबत मिनिमल ज्वेलरी आणि डोळ्यात काजळ भरलं आहे. ज्यामुळे तिचा लूक आणखी खास झाला.
advertisement
8/8
मराठी सिनेसृष्टीतील तिची ही अनोखी स्टाइल चाहत्यांना नेहमीच आवडते. प्राजक्ताने यापूर्वीही अशा अनेक पोस्ट्सद्वारे तिच्या सौंदर्याची आणि साधेपणाची झलक दाखवली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prajakta Mali : प्राजक्ताने केलाय मेकअप, त्यात काय दिसतंय वेगळं? म्हणाली, 'कधी नव्हे ते...'