TRENDING:

साडेतीन तास बायकोला उन्हात ताटकळत ठेवलं, नेमकं काय घडलं? प्रसाद-मंजिरीच्या पहिल्या भेटीचा किस्सा

Last Updated:
Prasad Oak Manjiri Oak : प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. पहिल्या भेटीतच प्रसादने मंजिरीला त्याच्या स्वाभावातील काही गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या होत्या. त्यामुळे त्यांचं नातं बहरायला मदत झाली.
advertisement
1/7
प्रसाद-मंजिरीच्या पहिल्या भेटीचा किस्सा
प्रसाद ओक आणि मंजिरी ओक 7 जानेवारी 1998 मध्ये लग्नबंधनात अडकले. अनेक वर्षांच्या सुखी संसारानंतर मंजिरीने आता त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा शेअर केला आहे.
advertisement
2/7
राजश्रीला दिलेल्या मुलाखतीत मंजिरी ओक म्हणाली,"आमचं ज्यादिवशी जमलं त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही एका ठिकाणी भेटायचं ठरवलं होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही माझ्या क्लासच्या बाहेर सकाळी 9.30 वाजता भेटणार होतो. 1 वाजला तरी प्रसाद आला नाही. त्यावेळी मी 16 वर्षांची होते. त्यावेळी मोबाईल नव्हते. त्याच्या घरी फोन नव्हता. माझ्याही घरी फोन नव्हता. मी 1 वाजेपर्यंत प्रसादची वाट पाहत होते. शेवटी मी माझ्याघरी गेले.
advertisement
3/7
मंजिरी म्हणाली,"मी उशीरा घरी आल्याने आई खूप चिडलेली होती. पण तेव्हा मी पाच मिनिटांत एक वही देऊन येते असं आईला सांगून मी थेट प्रसादच्या घरी गेले".
advertisement
4/7
मला दरवाजात पाहून प्रसादची पहिली प्रतिक्रिया मला अपेक्षित होती,आईशप्पथ सॉरी-सॉरी. पण प्रसाद असं म्हणालेला,तू इथे काय करत आहेस". नात्याचा दुसरा दिवस असल्याने मला त्याच्यासोबत फार चिडताही आलं नाही, असं मंजिरी म्हणाली.
advertisement
5/7
मंजिरी म्हणाली,"प्रसादने त्यावेळी दोन दिवसाने होणाऱ्या स्पर्धेचं म्युझिक मला ऐकवलं. पुढे 10-15 मिनिटं गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की त्याला मला भेटायचं होतं. मी चिडलेले होते म्हणून त्याने 1942 मधील रूठ ना जाना हे गाणं लावलं".
advertisement
6/7
प्रसादने या पहिल्याच भेटीत मंजिरीला सांगितलं होतं,"सगळ्यात पहिलं मला मस्का लावता येत नाही. बाबू-शोना मला जमणार नाही, माझं सगळ्यात पहिलं प्रेम माझं क्षेत्र आहे. हे कायम माझं पहिलं प्रेम राहणार आहे".
advertisement
7/7
प्रसादच्या या स्पष्टवक्तेपणामुळे मंजिरी भक्कम राहिली. त्यानंतर पुढे यावरुन त्यांचे वाद झाले नाहीत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
साडेतीन तास बायकोला उन्हात ताटकळत ठेवलं, नेमकं काय घडलं? प्रसाद-मंजिरीच्या पहिल्या भेटीचा किस्सा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल