Shantanu Moghe: 4 वर्षात शंतनू मोघेवर दुःखाचा डोंगर, एकापाठोपाठ एक जवळच्या व्यक्तींनी सोडली साथ
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Priya marathe husband Shantanu Moghe : मराठी आणि हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रिया मराठे. 38 व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झालं. प्रियाच्या जाण्याचा सर्वांना मोठा धक्का बसला आहे मात्र तिचा नवरा अभिनेता शंतनू मोघेचं तर सर्वच उद्ध्वस्त झालं.
advertisement
1/7

मराठी आणि हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रिया मराठे. 38 व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झालं. प्रियाच्या जाण्याचा सर्वांना मोठा धक्का बसला आहे मात्र तिचा नवरा अभिनेता शंतनू मोघेचं तर सर्वच उद्ध्वस्त झालं.
advertisement
2/7
प्रिया मराठेचा पती शंतनू मोघे हा देखील एक प्रसिद्ध मराठी अभिनेता आहे. त्याने अनेक मालिकांमध्ये, चित्रपटांत आणि रंगभूमीवर लक्षवेधी भूमिका केल्या आहेत.
advertisement
3/7
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत शंतनूने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. याशिवाय ‘रावरंभा’, ‘कॅरी ऑन मराठा’, ‘लोकशाही’, ‘शूर आम्ही सरदार’ अशा चित्रपटांतून त्यांनी वेगवेगळे पैलू दाखवले.
advertisement
4/7
शंतनू मोघे हा ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचा पुत्र आहे. अभिनयाची परंपरा पुढे नेत त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सिनेसृष्टीसोबतच तो व्यवसायातही सक्रिय आहे.
advertisement
5/7
शंतनूचे वडील श्रीकांत मोघे यांचं 6 मार्च 2021 मध्ये निधन झालं. त्यांच्या जाण्याने शंतनू आणि प्रिया पूर्णपणे तुटले होते. आता त्याची पत्नी प्रियाचंही निधन झालं. त्यामुळे 4 वर्षात शंतनूवर मोठा दुःखाचा डोंगरच कोसळला.
advertisement
6/7
2012 साली प्रिया आणि शंतनू विवाहबद्ध झाले. त्यांचे नाते अतिशय घट्ट होते. प्रिया आजाराशी लढत असताना शंतनू सतत तिच्या पाठीशी उभे राहिले. तो नेहमीच प्रियाला साथ द्यायचा.
advertisement
7/7
प्रिया मूळची ठाण्याची. शुटिंगसाठी ती अंधेरीत राहत असे. तिच्या रुममेट शर्वरी लोहकरेच्या माध्यमातून तिची शंतनूसोबत ओळख झाली. शर्वरी आणि शंतनू ‘आई’ मालिकेत एकत्र काम करत होते. मालिकेच्या शेवटच्या दिवसांत झालेल्या पार्टीत पहिल्यांदा प्रियाला आणि शंतनूला जास्त वेळ एकत्र बोलायची संधी मिळाली. त्या रात्रीच्या गप्पांनी दोघांच्याही आयुष्यात एक नवा अध्याय सुरू झाला. मात्र लग्नाच्या 13 वर्षातच प्रिया शंतनूला एकटं सोडून गेली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Shantanu Moghe: 4 वर्षात शंतनू मोघेवर दुःखाचा डोंगर, एकापाठोपाठ एक जवळच्या व्यक्तींनी सोडली साथ