Aarya Jadhav: रॅप शो ते बिग बॉस; निक्कीला इंगा दाखवणारी आर्या जाधव कोण?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Who is aarya jadhav: बिग बॉसमध्ये निक्कीला मारुन राडा करणारी आर्या जाधव नेमकी कोण आहे? तिच्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.
advertisement
1/7

‘बिग बॉस मराठी 5’ घरात काल भाऊच्या धक्क्यावर आर्या जाधवला घराबाहेर काढण्यात आलं. निक्कीवर हात उचलल्यामुळे तिला ही मोठी शिक्षा मिळाली.
advertisement
2/7
टास्कदरम्यान आर्या व निक्कीमध्ये जोरदार खडाजंगी झाली आणि नंतर आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली. निक्कीच्या कानशिलात लगावत आर्याने ‘बिग बॉस’च्या नियमांचे उल्लंघन केलं आहे. त्यामुळे बिग बॉसने आर्याला बाहेर काढण्याचा निर्णय सांगितला.
advertisement
3/7
बिग बॉसमध्ये निक्कीला मारुन राडा करणारी आर्या जाधव नेमकी कोण आहे? तिच्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.
advertisement
4/7
आर्या जाधव मुळची अमरावतीची आहे. तिनं रॅप शो 'हसल 2' मध्ये सहभाग घेऊन आपली ओळख बनवली. रॅपमध्ये तिचा मराठी तडका लोकांच्या पसंतीस उतरला आणि ती व्हायरल झाली.
advertisement
5/7
आर्या जाधव ही उद्योजक हेमंत जाधव यांची मुलगी आहे. आर्याचा स्वतःचा बॅंडदेखील आहे. qk नावाचा तिचा स्वतःचा बॅंड आहे. जो युट्यूबवर रॅप, गाणी करुन प्रेक्षकांचं मनोरंजन करतो.
advertisement
6/7
आर्या जाधवला 'रॅपर गर्ल' म्हणूनही ओळखलं जातं. सोशल मीडियावर तिचा चांगलाच दबदबा असतो. त्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते.
advertisement
7/7
आर्या जाधवला बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आणि तिनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं. तिला बिग बॉस घराबाहेर काढताच आता प्रेक्षक तिला सपोर्ट करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Aarya Jadhav: रॅप शो ते बिग बॉस; निक्कीला इंगा दाखवणारी आर्या जाधव कोण?