रश्मिका-विजयचं फेब्रुवारीत लग्न फिक्स? उदयपूरच्या ग्रँड वेडिंगबाबत अभिनेत्रीने दिली मोठी अपडेट
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding : रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू आहेत. रश्मिकाने आता लग्नाबाबतच्या अफवांवर मौन सोडलं आहे.
advertisement
1/7

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू आहेत. ऑक्टोबर 2025 रोजी त्यांनी साखरपुडा केला होता. आता फेब्रुवारी 2026 मध्ये ते उदयपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याची चर्चा आहे. पण आता अभिनेत्रीने लग्नाबाबतच्या सर्व अफवांवर मौन सोडलं आहे.
advertisement
2/7
रश्मिका मंदाना हॉलिवूड रिपोर्टर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या 'द गर्लफ्रेंड' या नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटाबद्दल बोलताना दिसून आली. यावेळी तिने लग्नाच्या अफवांबाबतही भाष्य केलं. रश्मिकाने या अफवांची पुष्टीही किंवा खंडनही केलं नाही.
advertisement
3/7
रश्मिका मंदाना विजय देवरकोंडासोबतच्या राजस्थानमधील डेस्टिनेशन वेडिंगबद्दल म्हणाली,"मी लग्नाला पुष्टी देणार नाही किंवा खंडनही करणार नाही. फक्त एवढंच म्हणेन की, जेव्हा याबद्दल बोलण्याची वेळ येईल, तेव्हा बोलू."
advertisement
4/7
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा उदयपूरमध्ये आपल्या लग्नाची तयारी करत आहेत, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की त्यांची टीम उदयपूरमध्ये लग्नाची प्लॅनिंग करत आहे आणि लवकरच वेन्यूही अंतिम केला जाईल. मात्र या बातम्यांबद्दल रश्मिका मंदानाने कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही. तसेच तिने या बातम्यांचे खंडनही केलेले नाही.
advertisement
5/7
रश्मिका आणि विजय यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये हैदराबादमधील एका खास समारंभात साखरपुडा केला. विजयच्या टीमने त्यांनी साखरपुडा केल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. तसेच फेब्रुवारी 2026 मध्ये विजय आणि रश्मिका विवाहबंधनात अडकणार असेही त्यांनी सांगितले होते.
advertisement
6/7
गीता गोविंदम (2018) आणि डियर कॉम्रेड (2019) या चित्रपटांत रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी एकत्र काम केलं आहे. या चित्रपटाच्या शूटिंगपासूनच त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू होत्या. विजय आणि रश्मिका यांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे.
advertisement
7/7
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा नुकतेच 'द गर्लफ्रेंड'च्या सक्सेस पार्टीत एकत्र दिसले होते. विजयचा पाठिंबा पाहून रश्मिका भावूक झाली होती. या चित्रपटाच्या यशाचा विजयदेखील महत्त्वाचा भाग असल्याचं यावेळी रश्मिका म्हणाली होती. तसेच प्रत्येकाच्या आयुष्यात विजय देवरकोंडासारखा एक व्यक्ती असावा असंही रश्मिका म्हणालेली. रश्मिका आणि विजय देवरकोंडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रश्मिका-विजयचं फेब्रुवारीत लग्न फिक्स? उदयपूरच्या ग्रँड वेडिंगबाबत अभिनेत्रीने दिली मोठी अपडेट