TRENDING:

रितेश पहिल्या भेटीतच जेनेलियाला वाटलेला उद्धट, 'अशी' आहे महाराष्ट्राच्या लाडक्या दादा-वहिनीची फिल्मी लव्हस्टोरी

Last Updated:
Riteish Deshmukh Genelia Deshmukh : रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. जेनेलिया सुरुवातीला रितेशला इग्नोर करत असे. त्यानंतर पुढे त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं.
advertisement
1/8
'अशी' आहे महाराष्ट्राच्या लाडक्या दादा-वहिनीची फिल्मी लव्हस्टोरी
रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे बॉलिवूडचं लाडकं जोडपं आहे. रितेश-जेनेलिया हे महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिणी आहेत. दोघेही सोशल मीडियावर सक्रीय आहेत. त्यांचे रोमँटिक रिल्स चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतात. एकमेकांवर प्रेम करण्यासह ते एकमेकांचा तेवढाच आदरदेखील करतात.
advertisement
2/8
रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. 'तुझे मेरी कसम' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली होती. पहिल्या भेटीत जेनेलियाला रितेश खूप गर्विष्ठ वाटला होता. मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्याने रितेशमध्ये खूप अॅटीट्यूड असेल असं जेनेलियाला वाटलं होतं.
advertisement
3/8
'तुझे मेरी कसम'च्याच सेटवर 2002 च्या दरम्यान हळूहळू रितेश आणि जेनेलिया एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यावेळी जेनेलिया 16 वर्षांची तर रितेश 24 वर्षांचा होता.
advertisement
4/8
रितेश आणि जेनेलिया यांनी तब्बल 10 वर्षे एकमेकांना डेट केलं. 10 वर्षांच्या रिलेशननंतर ते 3 फेब्रुवारी 2012 मध्ये विवाहबंधनात अडकले. क्रिश्चियन आणि महाराष्ट्रीयन परंपरेनुसार कुटुंबिय, राजकीय मंडळी आणि बॉलिवूडकरांच्या उपस्थित त्यांनी लग्न केलं. रितेश-जेनिलियाला आता रियान आणि राहिल ही दोन मुलं आहेत.
advertisement
5/8
रितेश आणि जेनेलिया एकमेकांना 10 वर्षे डेट करत होते. पण या 10 वर्षांत कधीच त्यांनी एकमेकांना प्रपोज केलं नव्हतं. रितेश आणि जेनेलियाने स्वत:च याबाबत खुलासा केला आहे. कपिल शर्माच्या कार्यक्रमात जेनेलिया याबाबत म्हणाली होती की,"आमची मैत्री झाली, प्रेम झालं. पण आम्ही कधीच एकमेकांना प्रपोज केलेलं नाही. आम्हाला वाटलं आता ही लग्नासाठी योग्य वेळ आहे तेव्हा आम्ही लग्न केलं".
advertisement
6/8
रितेश आणि जेनेलिया एकमेकांना डेट करत असताना त्यावेळी व्हिडीओ कॉलसारख्या सोयी नव्हत्या. आऊटडोअर शूटसाठी गेलेलं असताना कॉल किंवा मेसेज करायला जास्त पैसे मोजावे लागायचे. एकदा डेटिंगच्या सुरुवातीच्या काळी रितेश एका शूटिंगनिमित्ताने 30 दिवसांसाठी न्यूयॉर्कला गेला होता. तर जेनेलिया साऊथ फिल्म करत होती. त्यामुळे त्यावेळी त्यांनी एकमेकांना पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी 30 दिवस एकमेकांना पत्र लिहिली".
advertisement
7/8
रितेश आणि जेनेलिया यांच्याकडे महाराष्ट्रातील एक आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. अनेकदा सोशल मीडियावर ते मजेदार व्हिडीओ शेअर करत असतात.
advertisement
8/8
रितेश आणि जेनेलियामध्ये क्वचितच भांडणे होतात. त्यांच्यात मतभेद असले तरीही ते एकमेकांवर ओरडत नाहीत. त्यांच्या नात्यात ते एकमेकांचा आदर करतात. तसेच रितेश जेनेलियाने हाकदेखील आदराने मारतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रितेश पहिल्या भेटीतच जेनेलियाला वाटलेला उद्धट, 'अशी' आहे महाराष्ट्राच्या लाडक्या दादा-वहिनीची फिल्मी लव्हस्टोरी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल