एकीकडे अक्षय खन्नाच्या डान्स ट्रेंड, दुसरीकडे बॉक्स ऑफिस धमाका; 12 दिवसांत 'धुरंधर'ची बजेटच्या दुप्पट कमाई
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Dhurandhar Box Office Collection : सोशल मीडियावर अक्षय खन्नाच्या धुरंधरमधील डान्सची क्रेझ पाहायला मिळतेय. तर दुसरीकडे धुरंधर बॉक्स ऑफिसवर धमाका करतोय. रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांच्या अभिनयाने सजलेला आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर सिनेमानं 12 दिवसांत बजेटच्या दुप्पट कमाई केली आहे. किती झालंय एकूण कलेक्शन?
advertisement
1/8

रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांचा दमदार अभिनय आणि आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा स्पाय थ्रिलर चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट केवळ दमदार कलेक्शन करत नाही तर रेकॉर्डही मोडत आहे. मंगळवारी रिलीजच्या 12 व्या दिवशी चित्रपटाने भारतात 400 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
advertisement
2/8
मंगळवारी रिलीजच्या 12 व्या दिवशी कलेक्शनमध्ये कोणतीही घट झाली नाही ज्यामुळे चित्रपटाने अगदी कमी वेळात 400 कोटींचा टप्पा ओलांडला. चित्रपटाचं एकूण कलेक्शन आता 411.25 कोटींवर पोहोचलं आहे.
advertisement
3/8
ट्रेड वेबसाइट सॅकनिकच्या वृत्तानुसार चित्रपटाने दुसऱ्या वीकेंडमध्ये (शनिवार-रविवार) भारतात 140 कोटींपेक्षा जास्त कलेक्शन केलं. ज्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीसाठी एक नवीन बेंचमार्क स्थापित झाला.
advertisement
4/8
त्यानंतर चित्रपटाने सोमवारी अंदाजे 30 कोटी कमावले आणि मंगळवारी (12 व्या दिवशी) अंदाजे 30 कोटी कमावून तीच गती कायम ठेवली. मनोरंजक गोष्ट म्हणजे, मंगळवारी सकाळी आणि दुपारी शोसाठी सोमवारपेक्षा जास्त गर्दी होती.
advertisement
5/8
तज्ञांचा असा विश्वास आहे की जर कलेक्शनमध्ये होणारा वाढ अशीच राहिली तर तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी धुरंधर 500 कोटींच्या नेट क्लबमध्ये एन्ट्री करू शकतो. यामुळे चित्रपटाचा ब्लॉकबस्टर दर्जा आणखी मजबूत होईल आणि तो हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर ठरेल.
advertisement
6/8
धुरंधर देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 400 कोटींची कमाई करणारा सातवा हिंदी चित्रपट बनला आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत चित्रपटाने आमिर खानच्या 'दंगल'च्या 387 कोटींच्या भारतीय बॉक्स ऑफिस कलेक्शनला मागे टाकलं.
advertisement
7/8
'धुरंधर'चं एकूण चित्र पाहता हे सिद्ध होतं की चांगली कथा आणि स्टार पॉवरसह हिंदी चित्रपट अजूनही मोठे आकडे गाठू शकतो. धुरंधर सिनेमाचं बजेट 150 कोटी इतकं आहे. 12 दिवसांत सिनेमानं बजेटच्या दुप्पट कमाई केली आहे.
advertisement
8/8
चित्रपटाविषयी सांगायचं झाल्यास, चित्रपटाचा हिरो हा अभिनेता रणवीर सिंह आहे. पण संपूर्ण चित्रपटात सध्या अभिनेता अक्षय खन्नाची क्रेझ पाहायला मिळतेय. अक्षय खन्ना चित्रपटात रहमान डिकेत ही भूमिका साकारली आहे. त्याची एन्ट्री आणि डान्स सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हिरोपेक्षा व्हिलन बसलेला अक्षय खन्नाच सर्वाधिक भाव खाऊन जातोय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
एकीकडे अक्षय खन्नाच्या डान्स ट्रेंड, दुसरीकडे बॉक्स ऑफिस धमाका; 12 दिवसांत 'धुरंधर'ची बजेटच्या दुप्पट कमाई