TRENDING:

Ticket Rules Change: रेल्वेनं पुन्हा बदलला नियम, तिकीट काढण्याआधी एकदा वाचाच

Last Updated:
भारतीय रेल्वेने आता १० तास आधी तिकीट कन्फर्मेशनची सुविधा दिली आहे. KYC आणि मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे आवश्यक असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
advertisement
1/5
Ticket Rules Change: रेल्वेनं पुन्हा बदलला नियम, तिकीट काढण्याआधी एकदा वाचाच
यापूर्वी ट्रेनचं तिकीट कन्फर्म होण्यासाठी वाट पाहावी लागत होती. 24 तास आधी कन्फर्म तिकीट होणार अशी मध्यंतरी घोषणा करण्यात आली, मात्र ती घोषणा कागदावरच राहिली. प्रत्यक्षात मात्र ट्रेन सुटण्याच्या काही तास अधिच तिकीट कन्फर्म झालं की नाही ते समजत होतं.
advertisement
2/5
या अडचणीमुळे व्हायचं काय की, आयत्यावेळी तिकीट कन्फर्म झालं नाही तर पर्यायी प्रवासाचे मार्ग शोधणं, बसचं आयत्यावेळी तिकीट मिळणं कठीण होऊन जात होता. या सगळ्या गोष्टींची कटकट आता करावी लागणार नाही. त्यासाठी भारतीय रेल्वेनं एक खास पाऊल उचललं आहे.
advertisement
3/5
आता १० तास आधीच तिकीट कन्फर्म झालं की नाही ते समजणार आहे. पहिला रिझर्व्हेशन चार्ज आता 10 तास आधीच तयार होणार आहे. रेल्वे बोर्डाकडून तसे आदेश काढण्यात आले असून त्याचा फायदा अनेक प्रवाशांना होणार आहे.
advertisement
4/5
सकाळी 5 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच्या गाड्यांसाठीचा चार्ज हा आदल्या दिवशी संध्याकाळी 8 वाजेपर्यंत तयार केला जाईल असं सांगितलं जात आहे. त्यामुळे प्रवाशांना आता आदल्या दिवशीच आपलं तिकीट कन्फर्म होणार की नाही ते समजणार आहे.
advertisement
5/5
तुम्ही स्वत:जर बुकिंग करत असाल तर त्यासाठी तुम्ही KYC करणं आवश्यक आहे. मोबाईल नंबर आधारशी लिंक असणं आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टी असतील तर तुम्ही झटपट बुकिंग करू शकता नाहीतर अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
Ticket Rules Change: रेल्वेनं पुन्हा बदलला नियम, तिकीट काढण्याआधी एकदा वाचाच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल