TRENDING:

'तुम्ही टीव्हीवर जे केलं...' Bigg Boss Marathi 6च्या मंचावर रितेशनं पुन्हा घेतली जान्हवी किल्लेकरची शाळा

Last Updated:
Riteish Deshmukh - Jahnavi Killekar : बिग बॉस मराठी 6 ची प्रेस कॉन्फरन्स नुकतीच पार पडली. यावेळी जान्हवी किल्लेकर आणि रितेश देशमुख पुन्हा समोरा समोर आले. यावेळी रितेशनं पुन्हा एकदा जान्हवीला मागच्या सीझनची आठवण करून दिली.
advertisement
1/9
'तुम्ही टीव्हीवर जे केलं..' BBM6 च्या मंचावर रितेशनं पुन्हा घेतली जान्हवीची शाळा
बिग बॉस मराठीचा सहावा सीझन येत्या 11 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याआधी बिग बॉसची प्रेस कॉन्फरन्स पार पडली. यावेळी रितेश देशमुखने ग्रँड एट्री घेतली. 
advertisement
2/9
बिग बॉस मराठी 5 ची स्पर्धक जान्हवी किल्लेकरनं ही प्रेस कॉन्फरन्स होस्ट केली. जान्हवीला पुन्हा बिग बॉसच्या मंचावर पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. रितेशनं देखील जान्हवीबरोबर सेल्फी क्लिक करत तिचं कौतुक केलं. 
advertisement
3/9
जान्हवीला पाहून रितेशला देखील बिग बॉस मराठी 5 चे दिवस आठवले. जान्हवीला बोलण्याची एकही संधी यावेळी भाऊने सोडली नाही. जान्हवी देखील ऐकतच राहिली आणि भाऊच्या म्हणण्यावर हो म्हणाली. 
advertisement
4/9
प्रेस कॉन्फरन्ससाठी आलेली जान्हवी किल्लेकर वेस्टर्न ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती.  रितेश देशमुखनं कमाल ब्लॅक सूटमध्ये एन्ट्री घेतली. जान्हवीनं रितेशचं जोरदार स्वागत केलं. 
advertisement
5/9
जाव्हवीला पाहून रितेशला देखील आनंद झाला. रितेशनं देखील जान्हवीचं पुन्हा एकदा बिग बॉसच्या मंचावर स्वागत केलं. रितेश म्हणाला, "बिग बॉस सीझन 6 तर्फे मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. जान्हवी परत एकदा बिग बॉसच्या स्टेजवर भेटून मला फार बरं वाटलं."
advertisement
6/9
जान्हवी म्हणाली, "बिग बॉसचा मागचा सीझन तुम्ही खूप कमाल होस्ट केला. खूप धक्के दिले आणि आम्हालाही बसले. तुमचा हा स्वभाव जगात कोणीही बघितला नव्हता. मी तो जवळून अनुभवला." 
advertisement
7/9
रितेश म्हणाला, "माझा हा स्वभाव मीसुद्ध पाहिला नव्हता. तुम्ही टीव्हीवर जे करणार तसंच मी वागणार ना. तुम्ही जर असं काही केलं असतं त्यामुळे मला ओरडावं लागलं नसतं, तर मी तसा वागलो असतो."
advertisement
8/9
जान्हवी म्हणाली, "हो सर. पण तुम्ही कौतुकही केलं आहे." रितेश म्हणाला, "हो कौतुकही भरभरून केलंय."
advertisement
9/9
बिग बॉस मराठी 6 सुरू होण्याआधीच काही स्पर्धकांची नावं समोर आली आहेत. अभिनेत्री दिपाली सय्यद, सागर कारंडे, अनुश्री माने, संकेत पाठक हे घरात जाणारे कन्फर्म स्पर्धक असल्याचं सांगितलं जात आहे. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'तुम्ही टीव्हीवर जे केलं...' Bigg Boss Marathi 6च्या मंचावर रितेशनं पुन्हा घेतली जान्हवी किल्लेकरची शाळा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल