TRENDING:

Shubhangi Sadavarte Divorce : लॉकडाऊनमध्ये लग्न, पोटापाण्यासाठी फुड स्टॉल चालवला; अभिनेत्रीचं करिअरवर पिकवर असताना सुटली नवऱ्याची साथ

Last Updated:
Shubhangi Sadvarte Divorce : अभिनेत्री शुभांगी गेली अनेक वर्ष मराठी इंडस्ट्रीत काम करतेय. मालिका, सिनेमा आणि नाटकात तिनं नाव कमावलं आहे. करिअर पिकवर असताना तिच्या नवऱ्याची साथ सुटली.
advertisement
1/9
लॉकडाऊनमध्ये लग्न, फुड स्टॉलही चालवला; करिअरवर पिकवर असताना सुटली नवऱ्याची साथ
सध्या मराठी रंगभूमीवर सध्या 'संगीत देवबाभळी' हे नाटक खूप लोकप्रिय आहे. या नाटकाच आवलीची भूमिका साकारणारी प्रसिद्ध शुभांगी सदावर्ते तिच्या बाबतीत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. शुभांगी आणि तिच्या नवऱ्याचा डिवोर्स झाला आहे. लग्नाच्या जवळपास 5 वर्षांनी त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
2/9
अभिनेत्री शुभांगी गेली अनेक वर्ष मराठी इंडस्ट्रीत काम करतेय. मालिका, सिनेमा आणि नाटकात तिनं नाव कमावलं आहे. करिअर पिकवर असताना तिच्या नवऱ्याची साथ सुटली.
advertisement
3/9
शुभांगी ही मुळची नाशिकची आहे. लहानपणापासूनच तिला संगीत आणि गायनाची आवड होती. तिचं संगीतात विशारद झालं आहे. तिनं संगीतात करिअर करावं अशी तिच्या वडिलांची इच्छा होती.
advertisement
4/9
कॉलेजमध्ये असताना तिने एकांकिका करताना संगीत आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. एकांकिका करत असताना तिला व्यावसायिक नाटकासाठी विचारणा झाला. 'संगीत देवबाभळी' हे तिचं पहिलं व्यावसायिक नाटक आहे.
advertisement
5/9
शुभांगीने आतापर्यंत अनेक टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यात तिची नवे लक्ष ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती. या मालिकेच्या वेळी तिच्या वडिलांना कोरोना झाला होता. तिला ही मालिका मिळाली हे तिने वडिलांना सांगितल्यानंतर वडील खूप खुश झाले होते. मात्र मालिका टेलिकास्ट होण्याआधीच त्यांचं निधन झालं. नवे लक्ष ही मालिका शुभांगीच्या करिअरला पुश देणारी ठरली.
advertisement
6/9
कोरोना काळात 2020 साली शुभांगीने संगीतकार आनंद ओकशी लग्न केलं. लॉकडाऊनचे नियम पाळून त्यांनी मोजक्या लोकांमध्ये लग्न केलं. लग्नानंतर वर्षभराचा काळ त्यांच्यासाठी खूप कठीण होता.
advertisement
7/9
कामं ठप्प झाल्याने शुभांगी आणि आनंद यांनी मिळून श्रीपदा फूड्स न्याहारी या नावाने फुड स्टॉल सुरू केला होता. या फुड स्टॉलमधून ते घरगुती लाडू, पिठं आणि चटण्या घरपोच उपलब्ध करून देत होते.
advertisement
8/9
शुभांगी आणि आनंद यांनी लग्नानंतरच्या काळात एकमेकांना खूप मोलाची साथ दिली होती. कोरोनानंतर शुभांगीचं करिअर पुन्हा एकदा सुरू झालं. लक्ष सारख्या अनेक मराठी मालिका तिला मिळाल्या.
advertisement
9/9
'संगीत देवबाभळी' या नाटकामुळे शुभांगीला खरी ओळख मिळाली. दोघेही या नाटकासाठी काम करत आहेत. दरम्यान करिअर पिकवर असताना शुभांगी आणि आनंद यांनी डिवोर्स सारखा मोठा निर्णय घेतला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Shubhangi Sadavarte Divorce : लॉकडाऊनमध्ये लग्न, पोटापाण्यासाठी फुड स्टॉल चालवला; अभिनेत्रीचं करिअरवर पिकवर असताना सुटली नवऱ्याची साथ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल