TRENDING:

ना 'आदिपुरूष', ना 'केरळ स्टोरी' ; 2023 मध्ये 'हा' एक चित्रपट ठरला लयभारी

Last Updated:
जवळ जवळ 2020 हे वर्ष संपत आलं आहे, या वर्षात अनेक बॉलिवूड आणि टॉलिवू़डच्या सिनेमानी एंट्री मारली आणि तगडी कमाई देखील केला. मात्र आजपर्यंत एकही चित्रपट शाहरुख खानच्या 'पठाण'चा विक्रम मोडू शकला नाही. 'पठाण' हा 2023 साली प्रदर्शित झालेला चित्रपट आहे, जो आतापर्यंत सर्वाधिक लोकांनी पाहिला आहे. शाहरूखच्या पठान चित्रपटाने साउथ इंडस्ट्रीला देखील धूळ चाखवली आहे.
advertisement
1/6

2/6
शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट यावर्षी जानेवारी महिन्यात रिलीज झाला होता, ज्यामध्ये दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम सारख्या स्टार्सनी काम केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. त्याच्या कमाईने सगळ्यांचीच झोप उडाली होती, कारण कमाईचा आकडाच तसा होता. याशिवाय देशभरात 3.49 कोटी लोकांनी शाहरुख खानचा 'पठाण' सिनेमापाहिला आहे. हा आकडा सर्व चित्रपटांमध्ये सर्वाधिक आहे. हे एक वेगळचं रेकॉर्ड आहे.(फोटो क्रेडिट्स: IMDB)
advertisement
3/6
साऊथ सुपरस्टार प्रभासचा 'आदिपुरुष' कमाईच्या बाबतीत निर्मात्यांच्या अपेक्षांवर खरा उतरू शकला नाही, पण सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या चित्रपटांच्या यादीत 'आदिपुरुष' दुसऱ्या स्थानावर आहे. हा चित्रपट 1.69 कोटी प्रेक्षकांनी पाहिला आहे. (फोटो क्रेडिट्स: IMDB)
advertisement
4/6
तिसऱ्या क्रमांकावर प्रसिद्ध दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांचा 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट आहे, ज्यामध्ये अदा शर्मा मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. देशभरातील चित्रपटगृहांमध्ये 1.57 कोटी लोकांनी हा सिनेमा पाहिला.
advertisement
5/6
शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटाने साऊथ फिल्म इंडस्ट्रीलाही मात दिली आहे. थलपथी विजय, अजित कुमार, चिरंजीवी अशा अनेक स्टारची जादू देखील शाहरूखच्या पठाण सिनेमासमोर फिकी पडली. थलपथी विजयचा 'वारिसू' चित्रपट 1.40 कोटी, मणिरत्नमचा 'पोन्नियिन सेल्वन 2' 1.35 कोटी, चिरंजीवीचा 'वॉल्टेयर वीरैया' 1.18 कोटी आणि अजित कुमारचा 'वारिसू' 94 लाख प्रेक्षकांनी पाहिला आहे. (फोटो क्रेडिट्स: IMDB)
advertisement
6/6
किंग खान चार वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर 'पठाण' चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर परतला आणि तो 2023 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'पठाण' हा पहिला हिंदी चित्रपट आहे, ज्याने देशभरात 500 कोटींहून अधिक कमाई केली आहे. त्याचबरोबर या 'पठाण'ची जगभरातील कमाई 1050 कोटी रुपये आहे. (फोटो क्रेडिट्स: IMDB)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ना 'आदिपुरूष', ना 'केरळ स्टोरी' ; 2023 मध्ये 'हा' एक चित्रपट ठरला लयभारी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल